सुधारित जम्मू काश्मिरात सरकार कुणाचे? अनिश्चितता कायम: भाजपाची समीकरणांची जुळवाजुळव सुरू

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:07+5:302014-12-25T22:41:07+5:30

श्रीनगर/ नवी दिल्ली : जम्मू काश्मिरात सरकार कुणाचे? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असून सरकार स्थापनेसंदर्भातील अनिश्चितता गुरुवारच्या घडामोडीनंतरही कायम आहे़ भाजपा पाठिंब्यासाठी राज्यात मुख्यधारेतील पक्षांच्या शोधात आहे़ नॅशनल कॉन्फरन्सने(एनसी) भाजपासोबत आघाडी करण्याच्या शक्यतांना तत्त्वत: नकार दिला आहे़ पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीने(पीडीपी) मात्र सत्तास्थापनेच्या मुद्यावर तूर्तास तरी मौन बाळगणे पसंत केले आहे़

Improved Jammu Kashmir Government? Uncertainty persists: BJP's equations begin to match | सुधारित जम्मू काश्मिरात सरकार कुणाचे? अनिश्चितता कायम: भाजपाची समीकरणांची जुळवाजुळव सुरू

सुधारित जम्मू काश्मिरात सरकार कुणाचे? अनिश्चितता कायम: भाजपाची समीकरणांची जुळवाजुळव सुरू

रीनगर/ नवी दिल्ली : जम्मू काश्मिरात सरकार कुणाचे? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असून सरकार स्थापनेसंदर्भातील अनिश्चितता गुरुवारच्या घडामोडीनंतरही कायम आहे़ भाजपा पाठिंब्यासाठी राज्यात मुख्यधारेतील पक्षांच्या शोधात आहे़ नॅशनल कॉन्फरन्सने(एनसी) भाजपासोबत आघाडी करण्याच्या शक्यतांना तत्त्वत: नकार दिला आहे़ पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीने(पीडीपी) मात्र सत्तास्थापनेच्या मुद्यावर तूर्तास तरी मौन बाळगणे पसंत केले आहे़
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी रात्री दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त मीडियाने दिले आहे़ यामुळे राज्यात भाजपा-एनसीचे सरकार स्थापन होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे़ खुद्द भाजपाने या वृत्ताचे खंडन केले आहे़ तिकडे नॅशनल कॉन्फरन्सच्या एका ज्येष्ठ नेत्यानेही नाव उघड न करण्याच्या अटीवर भाजपासोबत जाण्याच्या शक्यता धुडकावून लावल्या आहेत़ नॅशनल कॉन्फरन्सचे भाजपासोबत मूलभूत मतभेद आहेत़ त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्स भाजपासोबत जाण्याच्या शक्यता शून्य आहे, असे हा नेता म्हणाला़
विधानसभा निकालाचे चित्र स्पष्ट होता क्षणीच ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या पक्षाचा चिरपरिचित प्रतिस्पर्धी असलेल्या पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (पीडीपी) ला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवून सर्वांना धक्का दिला होता़ याबाबत छेडले असता, पीडीपीला दिलेला प्रस्ताव गंभीर आहे़ आता निर्णय पीडीपीला घ्यायचा आहे, असे हा नेता म्हणाला़
जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात जास्त २८ जागा जिंकणाऱ्या पीडीपीला बहुमतासाठी अन्य पक्षाची मदत घेणे अपरिहार्य आहे. शिवाय २५ जागा मिळालेली भाजपाही सर्व पर्यायांचा अवलंब करीत सरकार स्थापण्याचा दावा करण्याच्या मन:स्थितीत आहे. मात्र यापैकी भाजपाच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांनी वेग घेतला आहे़

बॉक्स
पीडीपीचे मौन
भाजपाचा गोटात जम्मू काश्मिरात सत्तास्थापनेच्यादिशेने हालचाली सुरू असताना, पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीने(पीडीपी) मात्र मौन बाळगणे पसंत केले़ भाजपासोबत जाणार की नॅशनल कॉन्फरससोबत जाणार की काँग्रेसच्या १२ आमदारांना सोबत घेणार, यावर पीडीपीने गुरुवारी भाष्य करणे टाळले़ भाजपाला सोबत घेण्यावरून पीडीपीत अंतर्गत मतभेद असल्याचे मानले जात आहे़


बॉक्स
जम्मू काश्मिरात भाजपा महत्त्वपूर्ण भूमिकेत -जेटली
जम्मू काश्मिरात आमच्यासमोर अनेक पर्याय आहेत़ राज्यात कुणाचेही सरकार येवो, भाजपा त्यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारेल, असे केंद्रीय अर्थमंत्री आणि पक्षाचे केंद्रीय निरीक्षक अरुण जेटली यांनी गुरुवारी स्पष्ट केले़ जम्मू काश्मिरात नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ नवनिर्वाचित आमदारांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांना सरकार स्थापनेबाबतच्या पुढील रणनीतीवर निर्णय घेण्याचे सर्वाधिकार दिले आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले़
भाजपाच्या रणनीतीचा खुलासा करण्यास नकार देत, आम्ही अपक्ष आमदारांच्या संपर्कात आहोत, केवळ एवढेच जेटलींनी सांगितले़ राज्यातील अ्न्य पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला़

कोट
प्रतीक्षा करणे आणि येणाऱ्या घडामोडी पाहणे तूर्तास अधिक योग्य ठरेल़ आमची योजना आम्ही मीडियासमक्ष उघड करणार नाही़
-अरुण जेटली, भाजपा नेते

बॉक्स
ओमर यांच्यासोबतच्या चर्चेचा इन्कार
नवी दिल्ली : जम्मू काश्मिरात सरकार स्थापनेसंदर्भात भाजपा नेत्यांनी दिल्लीत नॅशनल कॉन्फरन्सचे(एनसी) नेते ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतल्याचे वृत्त भाजपाने नाकारले आहे़ भाजपा नेत्यांनी दिल्लीत नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाशी चर्चा केल्याचे वृत्त निराधार आहे, असे टिष्ट्वट पक्ष सरचिटणीस राम माधव यांनी यासंदर्भात केले आहे़
एनसी नेते ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी रात्री भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचे वृत्त मीडियाने दिले आहे़ ओमर यांचे पिता फारूक अब्दुल्ला आणि आई यांच्यावर अलीकडे लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली आहे़ त्यांना भेटण्यासाठी ओमर लंडनला जाण्याच्या तयारीने शनिवारी दिल्लीत आले होते़ मात्र येथे एक रात्र थांबल्यानंतर ओमर लंडनला न जाता आल्यापावली परत श्रीनगरला रवाना झाले़ याबाबत विचारले असता ओमर यांनी यावर बोलण्यास नकार दिला़

बॉक्स
मुफ्ती मोहम्मद सईद यांनी नेतृत्व करावे-काँगेस
श्रीनगर : मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या नेतृत्वातील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीने(पीडीपी) जनादेशाचा आदर करीत नव्या सरकारचे नेतृत्व करावे, असा अनाहूत सल्ला काँग्रेसने पीडीपीला दिला आहे़ जम्मू काश्मिरात सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेल्या पीडीपीने जनादेशाचा सन्मान करून नव्या सरकारचे नेतृत्व करावे, असे प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे़
जम्मू काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सैफुद्दीन सोज यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना पीडीपीला हा सल्ला दिला़ स्थिती चिंताजनक आहे़ सत्तेचे भुकेले काही समूह व लोक विधानसभा निवडणुकीतील लोकशाही जनादेश पलटवून लावण्याच्या प्रयत्नात आहेत़ पीडीपीला लोकांनी कौल दिला आहे़ तेव्हा पीडीपीने नव्या सरकारचे नेतृत्व करावे, असे सोज म्हणाले़

Web Title: Improved Jammu Kashmir Government? Uncertainty persists: BJP's equations begin to match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.