सुधारित : जयशंकर नवे विदेश सचिव
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:37+5:302015-01-29T23:17:37+5:30
नवी दिल्ली : अमेरिकेतील भारताचे राजदूत एस. जयशंकर यांची बुधवारी रात्री अचानक सुजाता सिंग यांच्या जागी नवे विदेश सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९७७ च्या तुकडीतील आयएफएस अधिकारी जयशंकर यांच्या सेवानिवृत्तीला अवघे दोन दिवस बाकी होते. ते गुरुवारी विदेश सचिवपदाचा कार्यभार सांभाळतील. त्यांचा नवा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. सुजाता सिंग यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार होता. त्यांचा कार्यकाळ आठ महिन्यांची कमी करीत जयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या नियुक्ती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सुधारित : जयशंकर नवे विदेश सचिव
न ी दिल्ली : अमेरिकेतील भारताचे राजदूत एस. जयशंकर यांची बुधवारी रात्री अचानक सुजाता सिंग यांच्या जागी नवे विदेश सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. १९७७ च्या तुकडीतील आयएफएस अधिकारी जयशंकर यांच्या सेवानिवृत्तीला अवघे दोन दिवस बाकी होते. ते गुरुवारी विदेश सचिवपदाचा कार्यभार सांभाळतील. त्यांचा नवा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल. सुजाता सिंग यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार होता. त्यांचा कार्यकाळ आठ महिन्यांची कमी करीत जयशंकर यांची नियुक्ती करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या नियुक्ती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.