सुधारित - कोल्हापूरातील टोल वसुलीच्या स्थगितीला मुदतवाढ
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:30+5:302015-08-26T23:32:30+5:30
कोल्हापुरातील टोल वसुलीला

सुधारित - कोल्हापूरातील टोल वसुलीच्या स्थगितीला मुदतवाढ
क ल्हापुरातील टोल वसुलीला तीन महिन्यांसाठी स्थगितीमुंबई : कोल्हापूर शहरातील टोल वसुलीच्या स्थगितीला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आल्याची घोषणा सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. हा टोल कायमचाच बंद केला जाणार असून त्याबाबत कोल्हापूरकरांना दिलेला शब्द आमचे सरकार पाळेल आणि पुन्हा टोलवसुली होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.कोल्हापुरातील टोलवसुलीला दिलेल्या १५ दिवसांच्या स्थगितीची मुदत उद्या संपत आहे. त्यामुळे शिंदे यांनी आज संबंधितांची एक बैठक मंत्रालयात घेतली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर आदी उपस्थित होते. कोल्हापूर टोलप्रकरणी राज्य शासनाने शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने एमएसआरडीसीचे तत्कालिन सहव्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकन समिती नेमली होती. ही समिती तसेच आधीच्या शासनाने नेमलेली प्रा.कृष्णराव समिती यांच्या अहवालांचा अभ्यास करून मूल्यांकनाची अंतिम रक्कम निित करण्यासाठी मुख्य अभियंता तामसेकर यांच्या समितीची स्थापना १५ दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या समितीचे काम प्रगतीपथावर असून तिचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य शासन लवकरच टोलबंदचा अंतिम निर्णय घेईल, तोवर कोल्हापुरातील टोलवसुली बंद राहील, असे शिंदे यांनी पत्र परिषदेत सांगितले. टोल बंद करताना कंत्राटदाराचे खिसे भरणारा निर्णय केला जाणर नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)