(सुधारित) वर्गमित्राचे मारेकरी अजूनही मोकाटच !

By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:06+5:302015-07-08T23:45:06+5:30

(Improved) Assassin's creed still alive! | (सुधारित) वर्गमित्राचे मारेकरी अजूनही मोकाटच !

(सुधारित) वर्गमित्राचे मारेकरी अजूनही मोकाटच !

>संगमनेर (अहमदनगर) : वर्गमित्राच्या खूनप्रकरणी ५ अल्पवयीन मुलांसह ११ जणांवर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असून अद्याप कुणासही अटक झालेली नाही.
वर्गमित्रांच्या मारहाणीत किरण सोनवणे (१३) या इयत्ता सातवीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना राजापूर गावात घडली. किरणच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी पाच अल्पवयीन विद्यार्थ्यांसह ११ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी बुधवारी सकाळी राजापुरातील विद्यालय व किरणच्या कुटुंबाची भेट घेऊन चौकशी केली. गुन्हा दाखल असलेली पाचही मुले वर्गात हजर असल्याचे पोलिसांना आढळून आले. गुन्ह्यातील आरोपी अल्पवयीन असल्याने तपासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले प्राथमिक पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस करीत आहेत.
गुन्ह्यातील आरोपी अल्पवयीन असल्याने प्रथमदर्शनी पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात आहे. गरज पडल्यास मुलांना ताब्यात घेतले जाईल, असे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: (Improved) Assassin's creed still alive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.