सुधारित-मणिपूरमधील हिंसाचारात ५ ठार, २७ जखमी
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:13+5:302015-09-01T21:38:13+5:30
सूचना: आकडे बदल आणि काही अधिक माहिती आहे

सुधारित-मणिपूरमधील हिंसाचारात ५ ठार, २७ जखमी
स चना: आकडे बदल आणि काही अधिक माहिती आहेमणिपूरमधील हिंसाचारात ५ ठार, २७ जखमीविधेयकांना विरोध: खासदार,आमदारांची घरे जाळलीइम्फाल: मणिपूर विधानसभेत सोमवारी काही वादग्रस्त विधेयके मंजूर झाल्यानंतर चुडाचंदपूर जिल्ह्यात भडकलेल्या हिंसाचारात ५ जण ठार तर २७ जखमी झाले. या घटनेमुळे शहरात बेमुदत काळाकरिता संचारबंदी लागू करण्यात आली.राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला. राज्य सरकारमधील एक मंत्री, खासदार आणि पाच आमदारांच्या घरांना अज्ञात लोकांनी आग लावली. चुडाचंदपूर शहरात मंगळवारी तीन मृतदेह आढळले. त्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. तर हेंगलपचे आमदार मंगा वेईफेई यांच्या निवासस्थानाच्या मलब्यातून एक जळलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. मूळ मणिपुरातील रहिवासींना संरक्षण देण्यासाठी विधानसभेत तीन विधेयके पारित करण्यात आली होती. त्यानंतर काही तासातच हिंसाचाराचा उद्रेक झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाह्य मणिपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार थांगसो बेत, राज्याचे कुटुंब कल्याण मंत्री फुंगजांगफांग तोनसीम आणि थानलोमचे वुनगजागीन यांच्यासह पाच आमदारांची घरे जाळण्यात आली. घराची जाळपोळ करताना गंभीर जखमी झालेल्या एका हल्लेखोरास रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे. याशिवाय २० जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापैकी ७ जणांना प्रथमोपचारानंतर सुटी देण्यात आली, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.विधेयक मंजुरीच्या विरोधात पर्वतीय जिल्ह्यातील तीन आदिवासी विद्यार्थी संघटनांनी सोमवारी १२ तासांच्या बंदचे आवाहन केले होते. जाळपोळीतही याच संघटना सामील असाव्यात असा संशय आहे. (वृत्तसंस्था)तीन वादग्रस्त विधेयकेमणिपुरातील लोकांचे संरक्षण विधेयक २०१५मणिपूर भूमी महसूल आणि भूसुधार (सातवी दुरुस्ती) विधेयक २०१५मणिपूर दुकान आणि प्रतिष्ठाने दुरुस्ती विधेयक २०१५