सुधारित -पान १ - गारांचा मारा
By Admin | Updated: April 13, 2015 23:53 IST2015-04-13T23:53:09+5:302015-04-13T23:53:09+5:30
(बळींची संख्या सहा (खान्देशात ४) झाली आहे.)

सुधारित -पान १ - गारांचा मारा
(ब ळींची संख्या सहा (खान्देशात ४) झाली आहे.)-------------------गारांचा मारा सुरूच!राज्यात सहा बळी : मराठवाड्यात बळीराजावर अस्मानी संकट मुंबई : राज्यात सलग तिसर्या दिवशी गारपीट व अवकाळी पावसाचा मारा सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत सहा जणांचे बळी गेले आहेत. त्यात खान्देशातील चार व नगरमधील दोघांचा समावेश आहे. सलग तीन दिवसांच्या गारांच्या मार्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीचा सर्वाधिक तडाखा मराठवाडा व खान्देशला बसला आहे. मराठवाड्यात जालना, बीड, लातूर, परभणी, उस्मानाबादेत रविवारी सलग दुसर्या दिवशी गारांचा मारा सुरू होता, त्यामुळे शेतपिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. धुळे जिल्ह्यात मनोज युवराज साने (२२, रा. धांेगडे ता. साक्री) हा युवक अंगावर वीज पडून जागीच ठार झाला तर त्याचे दोन मित्र गंभीररीत्या भाजले. जळगावमध्ये झाड कोसळून मेहमुदा शेख चांद (५०) ही महिला ठार झाली. तर जिल्ह्यातील रावेर येथे विजेचा खांब अंगावर पडून रामसिंग सुका साबळे (५०) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. तर बाबूलाल मोतीराम सोनवणे (५०, रा. पष्टाणे ता. धरणगाव, जि. जळगाव) शनिवारी रात्री झोपलेले असताना मुसळधार पावसामुळे अंगावर झोपडी पडून त्यांचा अंत झाला. जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात गारपिटीने कांदा व केळीचे नुकसान झाले.मराठवाड्यात वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब रस्त्यावर पडल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली. बीडमध्ये सलग चौथ्या दिवशी गारा बरसल्या. लातूर जिल्ह्यात रविवारी रात्री गारांचा पाऊस झाला. नांदेड, जालना, हिंगोलीत सलग तीन दिवस वादळी पाऊस सुरू असल्याचे शेती उद्ध्वस्त झाली आहे. विदर्भात नागपूर, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यालाही रविवारी गारपिटीने झोडपले. त्यामुळे हरभरा, गहू यासह आंबा, लिंबू व संत्रा या फळपिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.अहमदनगरमध्ये दोन दिवसांत पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा, कांदा, डाळींब, गहू आणि हरभरा पिकांचे पंचनामे सुरू झाले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)-----------------नगरमध्ये दोन ठार अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवार व शनिवारी झालेल्या पावसाने दीडशे घरांची पडझड झाली. पारनेर तालुक्यात शुक्रवारी घरावरील पत्रे पडून सात वर्षांची मुलगी मृत्युमुखी पडली तर वीज पडून एका शेतकर्याचा मृत्यू झाला़ --------------------मराठवाडा, विदर्भात पावसाचा इशारादक्षिण गुजरातपासून महाराष्ट्र, कर्नाटक ते लक्षद्वीपपर्यंत हवेचा कमी दाबाचा पा सक्रिय आहे. परिणामी, बाष्पयुक्त वार्यांमुळे राज्यात अवकाळी पाऊस व गारपीट होत असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली. सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा वेधशाळेने दिला आहे़ -----------११ महिन्यांत विजेचे ६४ बळीअमरावती विभागात ११ महिन्यांत वीज पडून ६४ जणांचा मृत्यू झाला. जून २०१४ ते एप्रिल २०१५ मध्ये अतिवृष्टी व अवकाळी पावसात अंगावर वीज पडून यवतमाळ जिल्ह्यात १९ बळी गेले. तर अमरावतीमध्ये १७, अकोल्यात ९, बुलडाणा येथे १४ व वाशिम जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाला. ------------------------------------------