तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यावर छापे
By Admin | Updated: April 10, 2017 00:59 IST2017-04-10T00:59:02+5:302017-04-10T00:59:02+5:30
तामिळनाडुचे आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर, त्यांचे चेन्नई, त्रिची आणि पुडुकोट्टाई जिल्ह्यातील नातेवाईक व सहकारी यांच्या

तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यावर छापे
चेन्नई : तामिळनाडुचे आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर, त्यांचे चेन्नई, त्रिची आणि पुडुकोट्टाई जिल्ह्यातील नातेवाईक व सहकारी यांच्या
३५ ठिकाणांवर आयकर
विभागाच्या गुप्तचर शाखेने शुक्रवारी छापे घातले.
आर. के. नगर मतदार संघात १२ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय अण्णा द्रमुक (अम्मा) पक्षाला हा मोठा फटका बसल्याचे मानले जाते. आर. के. नगरमध्ये मतदारांना पैसे वाटण्यात विजयभास्कर यांचा कथित सहभाग असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे छापे घालण्यात आले.
अभिनेता सरथकुमार, अ. भा. अ. द्रमुकचे माजी खासदार चितलापकम सी राजेंद्रन आणि एमजीआर वैद्यकीय विद्यापीठाच्या एस. गीतालक्ष्मी यांच्या ठिकाणांवर छापे घालण्यात आले. सरथकुमार हे अ. भा. अ. द्रमुकचे (अम्मा) उमेदवार टी. व्ही. दिनकरन यांना भेटले व त्यांनी त्यांना गुरुवारी पाठिंबा जाहीर केला.
रोख ४.५ कोटी रुपये आणि आर. के. नगरमधील मतदारांना वाटण्यासाठी विजयभास्कर यांच्या विश्वासू लोकांना ८९ कोटी रुपये दिले जावेत याच्याशी संबंधित दस्तावेज चेन्नईत जप्त करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.