शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आयात होणाऱ्या डाळी विषारी; अन्नसुरक्षा प्राधिकरणाचे तपासणीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 06:28 IST

कमी पावसामुळे यंदा पाऊस देशातील डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून डाळींची आयात वाढण्याची शक्यता आहे, पण या आयातीत डाळी विषारी असल्याचे समोर आले.

- चिन्मय काळेमुंबई : कमी पावसामुळे यंदा पाऊस देशातील डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून डाळींची आयात वाढण्याची शक्यता आहे, पण या आयातीत डाळी विषारी असल्याचे समोर आले. केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणानेच (एफएसएसएआय) यासंबंधी सखोल तपासणीचे आदेश दिले आहेत.देशी डाळींचे पीक कमी असले की, केंद्र सरकार म्यानमार, कॅनडा व आॅस्ट्रेलिया येथून डाळ आयात करते. एफएसएसएआयनुसार, प्रामुख्याने कॅनडा व आॅस्ट्रेलिया येथून आयात होणाºया डाळींत ‘ग्लायफोसेट’ हे विषारी रसायन असण्याची भीती आहे. त्यामुळे जिथे-जिथे या डाळींची आयात होते, तेथील अन्न व औषधे प्रशासनाने या डाळींची तपासणी करावी. सर्व प्रादेशिक प्रयोगशाळांनी नमुन्यांची तपासणीचा अहवाल दर १५ दिवसांनी दिल्ली मुख्यालयाला पाठवावा, असे निर्देश प्राधिकरणाने दिले आहेत.केंद्र सरकारने डाळींची आयात ३ लाख टन इतकी निश्चित केली आहे, पण विदेशी डाळी मोठ्या प्रमाणात बाजारात आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारने डाळींच्या आयातीवर पूर्णपणे बंदी आणावी, अशी मागणी ग्रेन मर्चंट्स असोसिएशनचे प्रताप मोटवानी यांनी केली आहे.लठ्ठपणाला कारणीभूत ‘ग्लायफोसेट’‘ग्लायफोसेट’ या विषारी द्रव्यामुळे लठ्ठपणा, अल्झायमर, भ्रमिष्टपणा, लकवा यासारख्या आजारांची भीतीही असते. आजकाल लठ्ठपणाच्या तक्रारी वाढल्या आहेत.लठ्ठपणा वाढला की, विदेशी औषधांचा वापर वाढतो. त्यासाठीच ‘ग्लायफोसेट’युक्त डाळी भारतात पाठविल्या जात आहेत, असा आरोप आयातदारांनी केला आहे.मात्रा निश्चितच नाही ‘ग्लायफोसेट’ची मात्रा किती असावी, हे अन्न सुरक्षा व मानके कायद्यात आजवर निश्चितच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. आता घातक रसायन आढळल्यामुळे प्राधिकरणाला जाग आली आहे. त्यामुळे तूर्तास अमेरिकन ‘कोडेक्स’नुसार मात्रा ग्राह्य धरण्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. यामुळे आजवर असे लाखो लीटर घातक रसायन भारतीयांच्या पोटात गेले असण्याची भीती आहे. 

टॅग्स :Healthआरोग्य