(महत्त्वाचे) महाराष्ट्र-गुजरात सीमेवर दोन काश्मिरी युवक ताब्यात
By Admin | Updated: August 20, 2015 22:09 IST2015-08-20T22:09:51+5:302015-08-20T22:09:51+5:30
- अहमदाबाद एटीएस पथक दाखल

(महत्त्वाचे) महाराष्ट्र-गुजरात सीमेवर दोन काश्मिरी युवक ताब्यात
- हमदाबाद एटीएस पथक दाखलनवापूर (जि. नंदुरबार) : दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून तापी जिल्हा (गुजरात) पोलिसांनी दोन काश्मिरी युवकांना बुधवारी संध्याकाळी गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील सोनगड चेकपोस्ट नाक्यावर ताब्यात घेण्यात आले.दोन काश्मिरी युवक संशयास्पदरितीने महाराष्ट्रात जात असल्याचे या चेकपोस्ट नाक्यावरील पोलिसांच्या लक्षात आले. एटीएस पथकाने देशातील सर्व सीमा चेकनाक्यांवर संशयीत दहशतवाद्यांचे स्केच पाठविले आहेत. या स्केचच्या आधारे या दोन युवकांना तापी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अहमदाबाद एटीएस पथकाला ही माहिती देण्यात आल्यानंतर ते पथक रात्री व्यारा येथे दाखल झाले. त्यांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे. (वार्ताहर)