महत्त्वाचे - मंत्र्यांच्या वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:08+5:302015-02-14T01:07:08+5:30
मंत्र्यांच्या वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

महत्त्वाचे - मंत्र्यांच्या वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
म त्र्यांच्या वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार जखमीनाशिक : राज्यमंत्री दीपक केसरकर यांना औरंगाबाद येथे घेण्यासाठी जाणार्या वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना घोटी - सिन्नर रस्त्यावरील धामणी शिवारात शुक्रवारी दुपारी घडली़ दरम्यान, जखमी झालेल्या दुचाकीस्वारास मंत्र्याच्या वाहनचालकाने नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. घोटी पोलिसांनी चालक बाळ आमले याला ताब्यात घेतले आहे. मुंबई येथून घोटी - शिर्डी रस्त्याने जाणारे वाहन (क्र. एमएच ०१ एएन ८७३) धामणी शिवारात आल्यानंतर या वाहनाने पाव विक्री करणार्या उमर फारूक शेख यांच्या दुचाकीस धडक दिली. धडकेत शेख हे दूर फेकले गेले. अपघातात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. जखमी झालेल्या शेख याला वाहनचालकाने नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, हे वाहन औरंगाबाद येथे दीपक केसरकर यांना घेण्यासाठी जात असल्याची माहिती चालकाने दिली आहे़ (प्रतिनिधी)