महत्त्वाचे - सूरज मोहिते शहीद

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:02+5:302015-03-20T22:40:02+5:30

वाईचे जवान सूरज मोहिते शहीद

Important - Suraj Mohite Shaheed | महत्त्वाचे - सूरज मोहिते शहीद

महत्त्वाचे - सूरज मोहिते शहीद

ईचे जवान सूरज मोहिते शहीद
जावली तालुक्यावर शोककळा : काश्मिरात दहशतवादी हल्ल्यात वीरमरण
वाई : जम्मू काश्मीरमधील कथुआ येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारताच्या दोन जवानांना वीरगती प्राप्त झाली. त्यात जावली तालुक्यातील जवान सूरज सर्जेराव मोहिते (२४) यांचा समावेश आहे.
सिद्धनाथवाडीतील सूरज हे दोन वर्षांपूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले होते. त्यांनी दीड वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गेले सहा महिने ते जम्मू-काश्मीरमध्ये भारत-पाक सीमेवर कर्तव्य बजावत होेते. ते अविवाहित असून, त्यांचा मोठा भाऊ पोलीस दलात अलिबाग येथे कार्यरत आहे़ त्यांच्या मातोश्री उषा सर्जेराव मोहिते सिद्धनाथवाडी येथे वास्तव्यास आहेत.
सूरज हुतात्मा झाल्याची बातमी समजताच जावली तालुक्यावर शोककळा पसरली़ त्यांच्यावर वाई येथील सिद्धनाथवाडीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
-------
सुटी संपवून १५ दिवसांपूर्वीच रुजू
सूरज यांनी अतिशय प्रतिकूल परस्थितीत संघर्ष करून शिक्षण घेतले. त्यांचे प्राथमिक शिक्षण मूळ गावी सरताळे येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी किसन वीर महाविद्यालयात घेतले. महाविद्यालयात असताना त्यांनी बॉक्सिंगमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत वीस पदके त्यांनी मिळविली आहेत़ देशसेवा करण्याचे त्यांचे स्वप्न असल्याने केंद्रीय राखीव पोलीस दलात ते भरती झाले होते. पंधरा दिवसांपूर्वीच सुटी संपवून ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते.
-----
फोटो : २० सूरज मोहिते

Web Title: Important - Suraj Mohite Shaheed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.