शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

राज्य पानासाठी महत्त्वाचे

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

नाशिकला थंडी कायम; पारा काहीसा वधारलानाशिक : गेल्या आठवड्यापासून नाशिकमध्ये थंडीची लाट पसरल्याने नागरिकांना कडाक्याची थंडी सहन करावी लागत आहे. मात्र तापमानात किंचितशी वाढ झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला. नाशिकमध्ये आजचे तापमान ७.३ इतके नोंदले गेले. बिबट्याची आल्याची अफवा नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिकरोड भागात लोकवस्तीत बिबट्या दिसल्याची चर्चा निवळत नाही ...


नाशिकला थंडी कायम; पारा काहीसा वधारला
नाशिक : गेल्या आठवड्यापासून नाशिकमध्ये थंडीची लाट पसरल्याने नागरिकांना कडाक्याची थंडी सहन करावी लागत आहे. मात्र तापमानात किंचितशी वाढ झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला. नाशिकमध्ये आजचे तापमान ७.३ इतके नोंदले गेले.

बिबट्याची आल्याची अफवा
नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिकरोड भागात लोकवस्तीत बिबट्या दिसल्याची चर्चा निवळत नाही तोच जेलरोड, पंचवटी, पाथर्डी, वडनेर, इंदिरानगर भागात बिबट्या दिसल्याची चर्चा होऊ लागली आहे. या अफवांमुळे वन कर्मचार्‍यांची धावपळ होत आहे.

तोतलाडोह वनक्षेत्रातील कॉलनीचे पुनर्वसन
नागपूर : तोतलाडोह (पेंच राष्ट्रीय उद्यान ) वनक्षेत्रातील पाटबंधारे विभागाच्या कॉलनीचे दोन वर्षांत पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती हायकोर्टात सादर करण्यात आली. नेचर कन्झर्व्हेशन सोसायटीने तोतलाडोह येथील वनसंरक्षण, प्रतिबंधित क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन इत्यादी मुद्यांकडे लक्ष वेधणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. याप्रकरणात पाटबंधारे विभागाचे नागपूर येथील अधीक्षक अभियंता व प्रशासक आर. के. धावडे यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.

मुख्यमंत्र्यांच्या वजनाहून अधिक रक्तदान
नागपूर : राष्ट्रीय नागपूर कापार्ेरेशन एम्प्लाईज असोसिएशनतर्फे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज इमारतीच्या आवारात आयोजित रक्तदान शिबिरात शुक ्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाहून अधिक रक्त गोळा करण्यात आले. मुख्यमंत्री हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या वजनाइतके रक्त गोळा करण्याचा संकल्प विविध कर्मचारी संघटनांनी केला होता. यात ३८७ कर्मचार्‍यांनी रक्तदान केले. गोळा के लेले रक्त अर्पण रक्तपेढीला सुपूर्द करण्यात आले.

रोहयोने केले महिलांना स्वावलंबी
गडचिरोली : यावर्षी रोजगार हमी योजनेंतर्गत सुमारे १३ लाख दिवस महिलांना रोजगार पुरविण्यात आला आहे. त्यामुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास फार मोठी मदत झाली आहे.

बालिकेचा विनयभंग
वर्धा- सेलू तालुक्यातील खापरी येथे एका बालिकेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. सदर बालिका शेतात जेवणाचा डबा घेऊन जात होती. दरम्यान रविंद्र वैद्य नावाच्या तरूणाने तिला वाटेत अडविले व पैसे देण्याचे आमिष दिले. त्यामुळे सदर बालिकेने तेथून पळ काढला असता आरोपीने तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला.

नायब तहसीलदाराला धक्काबुक्की
यवतमाळ - अवैध रेती वाहून नेताना वाहन (क्र. एमएच २६ एडी १९१) च्या चालक आणि क्लिनरला नायब तहसीलदार देवानंद ढबाले यांनी अटकाव केला. यावेळी संबंधितांनी त्यांना धक्काबुक्की केली. ही घटना पुसद येथील श्रीरामपूर परिसरात घडली.

दोघांची कापूस
ग्रेडरला मारहाण
यवतमाळ - कापसाच्या प्रतवारी वरून वाद घालून अनिल विधळे या पणन महासंघाच्या ग्रेडरला प्रमोद देशे˜ीवार आणि त्याच्या साथीदाराने मारहाण केली. ही घटना पांढरकवडा येथील अग्रवाल जिनिंगमध्ये घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

यात्रा नियोजन बैठक
अहमदनगर : कोरठण खंडोबा येथे दि़ पाच ते सात जानेवारी दरम्यान होणार्‍या यात्रौत्सवासंदर्भात नियोजनासाठी तहसीलदार दत्तात्रय भाऊले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी देवस्थानचे अध्यक्ष ॲड़ पांडुरंग गायकवाड, उपाध्यक्ष रामदास मुळे, सहा़ पोलीस निरीक्षक सुनील मेढे आदी उपस्थित होते़ यावेळी यात्रेच्या नियोजनाविषयी चर्चा करण्यात आली़
...
नाहारकत दाखला
अहमदनगर: शासनाने महापालिकेसह नगरपालिका हद्दीतील बिगर शेती करण्याबाबतचे नियम शिथिल केले आहे़ तसा आदेशही जारी करण्यात आला आहे़ मात्र याविषयीचे मागदर्शन जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले नाही़ त्यामुळे प्रशासनाकडून सातबारा तपासून ना हरकत दाखला देण्यात येत आहे़
....

गळफास घेऊन एकाची आत्महत्या
नरखेड : भोयरे (ता़ मोहोळ जि.सोलापूर) येथील बाळासाहेब अर्जुन जाधव (वय ४३) यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही ़ घरगुती कारणावरून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला़ या घटनेची फिर्याद मयताचा भाऊ शिवाजी जाधव यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिली़

दोन गुटखा कंपन्यांसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
सोलापूर : अकलूज येथील विजय चौकात पकडण्यात आलेल्या गुटख्याप्रकरणी जगन्नाथ रंगनाथ भांबोर याच्यासह सोसायटी व नजर गुटखा या कंपन्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम यांनी केली.