महत्वाच्या सिंगल

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:22+5:302015-02-13T00:38:22+5:30

प्रयोगशाळेत चोरी

Important single | महत्वाच्या सिंगल

महत्वाच्या सिंगल

रयोगशाळेत चोरी
नागपूर : कंेद्रीय लोक निर्माण विभागाच्या प्रयोगशाळेतून चोरट्यांनी टेस्टिंग मशीन, लोखंडी हॅण्डल,
बेईंग लोखंडी प्लेट, डेझर कूलरच्या पाण्याची मोटार, पंख्याचे पाते, टाईल्स मशीन, इलेक्ट्रिकल टाईल्स
टेस्टिंग मशीन, बॅलेन्स मशीन, क्यूब गोल्ड, वॉल फॅन व इतर असे ६३ हजारांचे साहित्य चोरून नेले, आज ही घटना उघडकीस आली. राहुल घनश्याम नांदगावकर यांच्या तक्रारीवरून बुधवारी गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
---
विद्यार्थिनीची पर्स लंपास
नागपूर : आकांक्षा अनुपकुमार गुप्ता (वय १९, रा. अयोध्यानगर) या विद्यार्थिनीची १० हजारांची रोकड असलेली पर्स दोन लुटारूंनी हिसकावून नेली. बुधवारी सायंकाळी ६ वाजता कुलबास्वामी हॉटेलजवळ ही घटना घडली. सक्करदरा पोलिसांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला.
---
करंट लागल्याने मृत्यू
नागपूर : करंट लागल्यामुळे लव राजेंद्र सहानी (वय २४) या तरुणाचा बुधवारी रात्री करुण अंत झाला. तो कळमन्यातील बजरंग चौक, विजयनगरात राहात होता. कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
------

Web Title: Important single

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.