(महत्त्वाचे) गोदातीरी उद्यापासून सिंहस्थ कुंभपर्व

By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:35+5:302015-07-12T23:56:35+5:30

(Important) Simhastha Kumbh Parva from Godatari tomorrow | (महत्त्वाचे) गोदातीरी उद्यापासून सिंहस्थ कुंभपर्व

(महत्त्वाचे) गोदातीरी उद्यापासून सिंहस्थ कुंभपर्व

>
नाशिक : गोदातीरी मंगळवारपासून सिंहस्थ कुंभपर्व सुरू होत आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी गुरू आणि रवि, सिंह राशीत प्रवेश करतील. मंगळवारी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहणाने सिंहस्थपर्वाची तुतारी फुंकली जाईल.
सोमवारी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे शोभायात्रा निघणार आहेत, तर मंगळवारी सकाळी दोन्ही ठिकाणी पुरोहित संघामार्फत ध्वजारोहण सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये २९ ऑगस्टला प्रथम शाहीस्नान होईल. त्यानंतर मुख्य पर्वकाळातील द्वितीय शाहीस्नान १३ सप्टेंबरला त्यानंतर १९ ला नाशिक व २५ सप्टेंबरला त्र्यंबकेश्वरला तृतीय शाहीस्नान होईल. (प्रतिनिधी)
---------------------------
फोटो - १२एनएसके-गोदावरी
--------------------------

झळाळला गोदाघाट : नाशिकमध्ये मंगळवारी सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी होणार्‍या ध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभपर्वास प्रारंभ होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी विद्युत रोषणाईने उजळून निघालेला रामकुंड आणि गोदाघाट परिसर. (छायाचित्र- प्रशांत खरोटे)

Web Title: (Important) Simhastha Kumbh Parva from Godatari tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.