(महत्वाचे) निवडणुकीत माध्यमांची भूमिका प्रशंसनीय

By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30

निवडणुकीत माध्यमांची भूमिका प्रशंसनीय

(Important) The role of the media in elections is laudable | (महत्वाचे) निवडणुकीत माध्यमांची भूमिका प्रशंसनीय

(महत्वाचे) निवडणुकीत माध्यमांची भूमिका प्रशंसनीय

वडणुकीत माध्यमांची भूमिका प्रशंसनीय
सी़विद्यासागर राव : लोकमतचे गजानन जानभोर यांना चिंतामणराव मारपकवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार
नागपूर : राज्यात अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकीत प्रसिद्धी माध्यमांची भूमिका प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी येथे केले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि मारपकवार परिवारातर्फे दिल्या जाणार्‍या दलित मित्र, स्वातंत्र्य संग्राम सेनानी चिंतामणराव मारपकवार स्मृती पत्रकारिता पुरस्कारांचा वितरण समारंभ शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला होता. पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे सहायक संपादक गजानन जानभोर यांना राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि २५ हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी वरिष्ठ पत्रकार कार्तिक लोखंडे आणि नितीन तोटेवार यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांना जीवनगौरव पुरस्काराने यावेळी गौरवान्वित करण्यात आले. (प्रतिनिधी)
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
बॉक्स
पुरस्काराची रक्कम प्लॅटफॉर्म शाळेला
गजानन जानभोर यांनी पुरस्कार स्वरूपात मिळालेली २५ हजार रुपयांची रक्कम नागपुरातील प्लॅटफॉर्म ज्ञानमंदिर निवासी शाळेला देणगी स्वरूपात दिली. घरून पळून गेलेल्या, वाममार्गाला लागलेल्या रेल्वे स्थानकावरील अनाथ मुलांचे संगोपन करण्याचे काम ही शाळा करते.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
स्रँङ्म३ङ्म
12्नंल्लुँङ्म१ या नावाने फोटो पाठविण्यात आला आहे़
फोटो ओळ
लोकमतचे गजानन जानभोर यांना चिंतामणराव मारपकवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान करताना राज्यपाल सी. विद्यासागर राव.

Web Title: (Important) The role of the media in elections is laudable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.