महत्वाची- सिकलसेल-थॅलेसिमियाच्या रुग्णांना आवश्यक सुविधा मिळाव्यात

By Admin | Updated: July 3, 2015 23:00 IST2015-07-03T23:00:15+5:302015-07-03T23:00:15+5:30

सिकलसेल-थॅलेसिमियाच्या रुग्णांना आवश्यक सुविधा मिळाव्यात

Important- To provide essential facilities for patients with Scycal-thalassemia | महत्वाची- सिकलसेल-थॅलेसिमियाच्या रुग्णांना आवश्यक सुविधा मिळाव्यात

महत्वाची- सिकलसेल-थॅलेसिमियाच्या रुग्णांना आवश्यक सुविधा मिळाव्यात

कलसेल-थॅलेसिमियाच्या रुग्णांना आवश्यक सुविधा मिळाव्यात
विकी रुघवानी यांची मागणी : अभ्यागत मंडळाच्या बैठकीत व्हावा निर्णय
नागपूर :
थॅलेसिमिया व सिकलसेल रुग्णांना शासकीय रुग्णालयात आवश्यक औषधोपचार व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी थॅलेसिमिया सोसायटी ऑफ सेंट्रल इंडियाचे अध्यक्ष डॉ. विकी रुघवानी यांनी केली आहे.
शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे सुद्धा सहभागी होणार आहेत. याशिवाय सर्व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारीसुद्धा उपस्थित राहतील. तेव्हा या बैठकीत सिकलसेल व थॅलेसिमियाच्या रुग्णांवरही सखोल चर्चा होऊन, निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
थॅलेसिमियाच्या रुग्णांना नियमित औषधांचा पुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या रुग्णांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियमितपणे गोळ्या उपलब्ध राहाव्यात. तसेच मेडिकलमध्ये सीव्हीएसची सुविधा उपलब्ध केल्यास रुग्णांवर होणारा अतिरिक्त खर्चाचा भार वाढणार नाही. याशिवाय थॅलेसिमिया आजार असलेल्या रुग्णांना वारंवार देण्यात येणाऱ्या रक्त संचयनामुळे एचआयव्ही व हेपेटायटेस बी सारख्या रोगांचे संक्रमण होण्याची भीती असते. सुरक्षित रक्त संचयनासाठी मेडिकलच्या रक्तपेढीमध्ये नेट टेस्टींगची सुविधा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा डॉ. विकी रुघवानी यांनी केली आहे.

Web Title: Important- To provide essential facilities for patients with Scycal-thalassemia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.