महत्त्वाचे - पीएफ- धार्मिक यात्रा

By Admin | Updated: June 2, 2014 23:58 IST2014-06-02T23:58:25+5:302014-06-02T23:58:25+5:30

भविष्य निर्वाह निधीतून

Important - PF - Religious Travel | महत्त्वाचे - पीएफ- धार्मिक यात्रा

महत्त्वाचे - पीएफ- धार्मिक यात्रा

िष्य निर्वाह निधीतून
आता धार्मिक यात्रेचा खर्च

नाशिक : शासकीय कर्मचार्‍यांना भविष्य निर्वाह निधीतून धार्मिक यात्रेचा खर्च भागविण्यासाठी रक्कम (ना परतावा) काढण्यास शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे.
३१ मे रोजीच यासंदर्भात शासननिर्णय झाला आहे. त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम १९९८ मधील नियम क्रमांक १६ नुसार वर्गणीदाराची दहा वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर (मध्ये खंड झाला असल्यास खंडित सेवेचा समावेश करून) अथवा नियत सेवानिवृतीपूर्वी दहा वर्षे यापैकी जे आधी घडेल त्यावेळी वर्गणीदाराच्या खाती जमा असलेल्या निधीच्या रकमेतून स्वत:च्या अथवा महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियमाच्या कुटुंबाच्या व्याख्येमध्ये समाविष्ट असलेल्या वर्गणीदाराच्या कुटुंबातील व्यक्तींच्या धार्मिक यात्रेचा खर्च भागविण्यासाठी रक्कम काढण्यास शासनाने काही अटींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. या धार्मिक यात्रेच्या खर्चाची रक्कम शासनसेवेतील संपूर्ण कालावधीत फक्त एकदाच अनुदेय असेल. या निर्णयाचा हज यात्रेसाठी जाणार्‍या मुस्लीम कर्मचारी बांधवांनाही फायदा होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Important - PF - Religious Travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.