महत्वाचे / मुखेडमध्ये ५७ टक्के मतदान

By Admin | Updated: February 14, 2015 01:07 IST2015-02-14T01:07:05+5:302015-02-14T01:07:05+5:30

Important / Opposition 57 percent voting | महत्वाचे / मुखेडमध्ये ५७ टक्के मतदान

महत्वाचे / मुखेडमध्ये ५७ टक्के मतदान

>मुखेडमध्ये ५७ टक्के मतदान
नांदेड : मुखेड विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार गोविंद राठोड यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी शुक्रवारी पोटनिवडणूक झाली़ दिवसभरात एकूण ५७ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाने कळविले आहे.
मतदारसंघात संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्राच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ कोणताही अनुचित प्रकार न घडता, मतदारांनी उत्स्फूर्तपणे व शांततेत मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला़ पोटनिवडणुकीत भाजपाचे तुषार राठोड, काँग्रेसचे हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, इंडियन युनियन मुस्लिम लीगचे अजिमोद्दीन हाफेजसहाब, भारिप बहुजन महासंघाचे विजय कांबळे व इतर उमेदवार- अनिल शिरसे, अफजल शेख, विजयमाला गायकवाड असे सात उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत़ मतमोजणी १६ फेब्रुवारी रोजी मुखेड जिल्हा परिषद कन्या हायस्कुल येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Important / Opposition 57 percent voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.