महत्वाचे... जोड एक

By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:56+5:302015-02-18T00:12:56+5:30

सावनेर तालुक्यात अवैध रेती व मुरुम उत्खनन

Important ... one of the pairs | महत्वाचे... जोड एक

महत्वाचे... जोड एक

वनेर तालुक्यात अवैध रेती व मुरुम उत्खनन
सावनेर : तालुक्यात रेती व मुरुमाचे अवैधरीत्या उत्खनन करण्यात येत असून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रेती व मुरुम तसेच अन्य गौण खनिजाचे सर्रास अवैध उत्खनन होत असल्याने शासनाचा महसूल बुडत आहे. याकडे महसूल अधिकाऱ्यांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
.....
झाडांना पाणी देण्याची व्यवस्था करा
कळमेश्वर : तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत हजारो वृक्षांची लावगड केली आहे. पावसाळा संपल्याने सदर वृक्षांना पाणी देणे आवश्यक झाले आहे. पाण्याअभावी रस्त्याच्या कडेला लावलेली झाडे कोमेजायला लागली आहेत.
.....
प्रवासी निवाऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष
काटोल : तालुक्यातील प्रत्येक गावी प्रवासी निवारे बांधण्यात आले आहेत. मात्र या प्रवासी निवाऱ्यांकडे एसटी विभाग व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. काही निवारे मोडकळीस आले आहेत. काही निवाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण पसरली आहे.

Web Title: Important ... one of the pairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.