शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

(महत्त्वाचे) बंडीतून एक किलो सोन्याची तस्करी!

By admin | Updated: April 18, 2015 01:43 IST

भामट्यास अटक : औरंगाबाद पोलिसांची कारवाई औरंगाबाद : महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच शर्टच्या आत असलेल्या बंडीला खिसे बनवून त्यातून सोन्याची तस्करी करणार्‍या रामदास नानासाहेब सावंत (रा. रामनगर, एन-२ सिडको) याला गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी दुपारी मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्या ताब्यातून १,१३० ग्रॅम सोने आणि सव्वा लाखांची रोकड जप्त ...


भामट्यास अटक : औरंगाबाद पोलिसांची कारवाई

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच शर्टच्या आत असलेल्या बंडीला खिसे बनवून त्यातून सोन्याची तस्करी करणार्‍या रामदास नानासाहेब सावंत (रा. रामनगर, एन-२ सिडको) याला गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी दुपारी मोठ्या शिताफीने अटक केली.
त्याच्या ताब्यातून १,१३० ग्रॅम सोने आणि सव्वा लाखांची रोकड जप्त केली. सावंतने हे सोने कोठून आणले, याचा पोलीस तपास करीत आहेत. मतदारांना भुलविण्यासाठी पैसे वाटप करण्याच्या हेतूने एका पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट कारमधून एक जण मुंबईहून मोठी रक्कम घेऊन येत आहे. हा सर्व काळा पैसा आहे, अशी माहिती एका खबर्‍याने गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांना कळविली.
आघाव यांनी खबर्‍याने सांगितलेल्या बजाजनगरातील मोहटादेवी चौकाजवळ सरस्वती ज्वेलर्सजवळ सापळा रचला. काही वेळातच खबर्‍याने सांगितलेल्या वर्णनाची कार तेथे आली. पोलिसांनी कारची झडती घेतली. मात्र, कारमध्ये काहीच सापडले नाही. खबर्‍याने खोटी टीप दिली असावी, असा पोलिसांचा समज झाला. त्यामुळे सावंतला सोडून देण्याचा पोलिसांचा विचार होता. परंतु त्याची झडती सुरू करताच सावंत अंग चोरू लागला. त्यामुळे आघाव यांना संशय आला. त्यांनी त्याची बंडी तपासली असता त्यात सोन्याचा खजिनाच निघाला. या बंडीला अनेक खिसे बनविण्यात आले होते आणि त्यात सोन्याचे दागिने ठेवलेले होते. (प्रतिनिधी)
-----------
रामदास सावंतच्या बंडीत सोन्याची कर्णफुले, अंगठ्या, पदक, बाळी, नेकलेस, बांगड्या, मणी अशा प्रकारचे तब्बल १ किलो १३० गॅ्रम सोने आढळून आले. तसेच १ लाख २५ हजार रुपये रोख रक्कमही मिळाली. सावंतने पोलिसांना त्याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याच्या बँक खात्याची तपासणी केली असता त्यावर फारशी उलाढालही दिसली नाही.