महत्वाचे-मराठीला राजभाषेचा दर्जा-पान १
By Admin | Updated: July 31, 2015 23:54 IST2015-07-31T23:54:51+5:302015-07-31T23:54:51+5:30
मराठीच्या शिरपेचात राजभाषेचा मुकूट!

महत्वाचे-मराठीला राजभाषेचा दर्जा-पान १
म ाठीच्या शिरपेचात राजभाषेचा मुकूट!-मराठी राजभाषा विधेयक विधान परिषदेत संमत मुंबई-साद्रीच्या दर्या-खोर्यातून बालघाटच्या रांगेतून गर्जणार्या, संताच्या अभंगवाणीपासून आधुनिक साहित्यापर्यंत अभिव्यक्त होणार्या आणि अभिजनांपासून बहुजनापर्यंत सर्वांमुखी आलेल्या मराठी भाषेच्या डोईवर आज अधिकृतपणे राजभाषेचा मुकूट चढवला गेला. मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा असल्याचे सुस्पष्टपणे घोषित करण्यासाठीचे राजभाषा सुधारणा विधेयक आज विधान परिषदेतही एकमताने मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता मराठी भाषेला राजभाषा म्हणून कायदेशीर मान्यता मिळाली आहे.मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असल्याची स्पष्ट तरतूद आजवर कायद्यात नव्हती. त्यामुळे सभागृहाने सदर विधेयक एकमताने मंजूर करत ऐतिहासिक निर्णय घ्यावा आणि याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडावा, अशी मागणी दिवाकर रावते यांनी केली. राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले यांनी या मागणीला अनुमोदन देत मराठीला राजभाषेचा दर्जा देणारे विधेयक आणल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन केले. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधेयक सभागृहात मांडले. परंपरेने मराठी राजभाषा असली तरी कायद्यात तशी तरतूद नव्हती. याबाबत सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी पुढाकार घेत कायद्यात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी तावडे यांचे अभिनंदन केले. या विधेयकामुळे मराठी राजभाषेला कायदेशीर मान्यतेचा मार्ग मोकळा होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.त्यानंतर दोन्ही बाकांवरील सदस्यांनी एकमताने राजभाषा सुधारणा विधेयकावर संमतीची मोहोर उठवली. विधानसभेत हे विधेयक यापूर्वीच मंजूर झालेले असल्याने मराठीच्या राजभाषेवर आज अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले.(प्रतिनिधी)==============