महत्त्वाच्या बातम्या... जोड

By Admin | Updated: September 20, 2015 00:53 IST2015-09-20T00:53:47+5:302015-09-20T00:53:47+5:30

प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ

Important news ... add | महत्त्वाच्या बातम्या... जोड

महत्त्वाच्या बातम्या... जोड

रमाणपत्र मिळविण्यासाठी ग्रामस्थांची धावपळ
उमरेड : तालुक्यातील काही ग्रामपंचायत कार्यालयातील कॉम्प्यूटर ऑपरेटर वेळेवर कार्यालयात हजर राहत नसल्याने नागरिकांना विविध प्रमाणपत्र मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे ही समस्या सोडविण्याची मागणी केली जात आहे.
***
सावनेर तालुक्यात विजेचा लपंडाव
सावनेर : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासूून विजेचा सतत लपंडाव सुरू आहे. या प्रकरामुळे नागरिक त्रस्त झाले असून, पाण्याची टाकी भरण्याची पुरेसी वीज मिळत नसल्याने अनेक गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
***
वारेगाव - कोराडी मार्गावर खड्डे
कोराडी : वारेगाव - कोराडी मार्गावर रोज रेती व वीज केंद्रातील राखेची ट्रकद्वारे ओव्हरलोड वाहतूक केली जाते. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या मार्गाची दुरुस्ती करून ओव्हरलोड वाहतूक बंद करण्याची मागणी केली जात आहे.
***

Web Title: Important news ... add