महत्त्वाचे : राष्ट्रीय
By Admin | Updated: February 10, 2015 00:56 IST2015-02-10T00:56:25+5:302015-02-10T00:56:25+5:30
बुधवारी काँग्रेस सदस्यत्व मोहिमेची बैठक

महत्त्वाचे : राष्ट्रीय
ब धवारी काँग्रेस सदस्यत्व मोहिमेची बैठकजयपूर : राजस्थान काँग्रेस कमिटीच्या सदस्यत्व मोहिमेच्या प्रदेश आणि जिल्हा अध्यक्षांची बैठक येत्या ११ फेब्रुवारीला जयपूर येथे बोलावण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष डॉ. अर्चना शर्मा यांनी ही माहिती दिली. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सचिन पायलट हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहतील आणि मोहिमेला गती देण्याच्या संदर्भात मार्गदर्शन करतील.गॅस टँकरला आग, तीन गंभीर जखमीकानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील पनकी पडाव येथे रविवारी रात्री एका गॅस टँकरला आग लागल्याने चालकासह तीन जण भाजल्याचे वृत्त आहे. या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. इंडेन गॅस कंपनीचा हा टँकर घेऊन जाणारा चालक रघुराज सिंग हा रात्री चहा पिण्यासाठी एका ढाब्यावर थांबला होता. ढाब्यावर असलेल्या भट्टीतून निघालेली आगीची ठिणगी टँकरवर पडली आणि टँकरला आग लागली, असे पोलिसांनी सांगितले. पंजाब, हरियाणात थंडी ओसरलीचंदीगड : पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये सोमवारी थंडीचा जोर ओसरल्याचे वृत्त आहे. दरम्यान या दोन्ही राज्यांतील तापमान सामान्यापेक्षा जास्तच असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. चंदीगडमध्ये किमान तापमान ८.६ अंश सेल्सिअस नोंदविल्या गेले. तर हरियाणाच्या हिसार येथे ८.६ व अंबाला येथे ९.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.७४ बांगला देशी नागरिकांना परत पाठविलेधौलपूर : राजस्थानमध्ये गेल्या २५ डिसेंबर २०१४ रोजी अटक करण्यात आलेल्या ७४ बांगला देशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यासाठी सोमवारी अजमेर-सियालदाह एक्स्प्रेसने सियालदाह येथे नेण्यात आले. सियालदहा येथून त्यांना सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले जाईल आणि हे अधिकारी त्यांना बांगला देशात पाठवतील.महिला कैद्याचा मृत्यूफिरोजाबाद : जिल्हा कारागृहात हत्येच्या आरोपात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका महिला कैद्याचा सोमवारी मृत्यू झाला. ही महिला आजारी होती. सायरा बानो (४०) असे तिचे नाव आहे. मैनपुरीची राहणारी सायरा ही क्षयरोगाने पीडित होती. रविवारी रात्री तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी तिचा मृत्यू झाला.एलएलबीच्या विद्यार्थिनीशी गैरवर्तनमेरठ : एका गेस्ट हाऊसच्या मालकासह त्याच्या चार कर्मचाऱ्यांना एलएलबीच्या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन करून तिला जबर मारहाण केल्याच्या आरोपात पोलिसांनी अटक केली आहे. ३ फेब्रुवारीला ही घटना घडली होती. ही विद्यार्थिनी याच गेस्ट हाऊसमध्ये नोकरी करीत होती. गेस्ट हाऊसचा मालक सुभाष भारती याने तिच्याशी आधी लैंगिक संबंध प्रस्थापित केले आणि टेस्ट ट्युब बेबी तंत्रज्ञानाने पुत्र प्राप्तीसाठी दबाव टाकला. विद्यार्थिनीने त्यास नकार दिल्यावर त्याने तिला जबर मारहाण केली.विदेशी पर्यटकाच्या पासपोर्टची चोरीफरिदाबाद : सुरजकुंड मेळ्यादरम्यान एका विदेशी महिलेचा पासपोर्ट आणि अन्य एका भारतीय पर्यटकाचा मोबाईल चोरी झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे. लेबनान येथून आलेली फातिमा खातुनी हिचा पासपोर्ट व आयफोन चोरांनी पळविला. तर दिल्लीचे दीपक यांचा मोबाईल चोरण्यात आला.