शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

आज रिझर्व्ह बँक संचालक मंडळाची महत्त्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 05:57 IST

रिझर्व्ह बँकेच्या सुमारे ९ लाख कोटी रुपयांच्या संचित निधीपैकी सुमारे तीन लाख कोटी रुपये बँकेने आजारी सरकारी व्यापारी बँकांना भांडवल पुरविण्यासाठी सरकार कथित दबाव आणत असल्याच्या वृत्ताने मध्यंतरी बराच वाद झाला होता.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण नियोजित बैठक सोमवारी होत असून, गेल्या काही दिवसांत बँक आणि केंद्र सरकार यांच्यातील उघड झालेल्या वादमुद्द्यांवर या बैठकीतून काय व कसा मार्ग निघतो, याकडे जाणकारांचे लक्ष आहे.रिझर्व्ह बँकेच्या सुमारे ९ लाख कोटी रुपयांच्या संचित निधीपैकी सुमारे तीन लाख कोटी रुपये बँकेने आजारी सरकारी व्यापारी बँकांना भांडवल पुरविण्यासाठी सरकार कथित दबाव आणत असल्याच्या वृत्ताने मध्यंतरी बराच वाद झाला होता. परंतु सोमवारच्या बैठकीचा अ‍ॅजेंडा बराच आधी तयार होऊन तो संचालकांना वितरितही करम्यात आल्याने हा विषय त्यात नसल्याचे कळते. अर्थात अ‍ॅजेंडावर नसलेला विषयही अध्यक्षांच्या परवानगीने चर्चेसाठी घेतला जाऊ शकतो.याखेरीज रिझर्व्ह बँकेने बुडित कर्जांचा बोजा असलेल्या बँकांसाठी लागू केलेले ‘प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन’चे (पीसीए) कडक निर्बंध थोडे शिथिल करणे व सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या वित्त पुरवठयाचा मार्ग अधिक सुकर करणे हे चर्चेला येऊ शकणारे अन्य दोन विषय आहेत. अलाहाबाद बँक, युनायटेड बँक आॅफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक, आयडीबीआय बँक, युको बँक, बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स, देना बँक आणि बँक आॅफ महाराष्ट्र या बँकांना ‘पीसीए’चे निर्बंध लागू आहेत. रिझर्व्ह बँकेने त्याचे निकष थोडे शिथिल केले तर या बँका अधिक वित्तपुरवठा करू शकतील जेणेकरून अर्थव्यवस्थेस उभारी येण्यास हातभार लागेल, असे सरकारला वाटते. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांवर १४ कोटी लोकांचा रोजगार अवलंबून आहे. त्यांना नोटाबंदी व ‘जीएसटी’चा फटका बसला. त्यातून सावरण्यासाठी त्यांचा वित्तपुरवठा अझिक सुगम व्हावा, असा सरकारचा आग्रह आहे. पण याने बुडित कर्जांचे नवे दालन खुले होईल, अशी रिझर्व्ह बँकेस चिंता आहे. रिझर्व्ह बँकेच्या १८ सदस्यांच्या संचालक मंडळात गव्हर्नर व चार डेप्युटी गव्हर्नर पदसिद्ध संचालक आहेत. बाकीचे संचालक सरकारनियुक्त तर काही स्वंतत्र संचालक आहेत. वित्त मंत्रालयातील आर्थिक बाबी व वित्तीय सेवा विभागांचे सचिवही संचालक आहेत. रिझर्व्ह बँक कायद्याच्या कलम ७ नुसार सरकार बँकेस ठराविक गोष्ट करण्याचा आदेश देऊ शकत असले तरी रिझर्व्ह बँक देशाची मध्यवर्ती बँक या नात्याने आपली स्वायत्तता आणि स्वातंत्र्य कसे जपते, हे या बैठकीच्या योगाने पाहणे महत्वाचे आहे. सरकारी संचालकांनी आग्रह धरला तरी एकूणच बँकिंग क्षेत्र सुदृढ व्हावे यासाठी योजलेल्या उपायांच्या बाबतीत पदसिद्ध व स्वतंत्र संचालक बँकेच्या बाजूने उभे राहतील, अशी अपेक्षा आहे.अनुभव अत्यंत वाईटरिझर्व्ह बँक गव्हर्नरांबाबत आपला अनुभव फार चांगला नाही. त्यांना भेटण्याची कदापिही इच्छा नाही, असे मत केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक