(महत्त्वाचे) बॉम्बे आर्ट सोसायटीत कामत, नाईक यांना बहुमत

By Admin | Updated: September 6, 2015 23:54 IST2015-09-06T23:54:51+5:302015-09-06T23:54:51+5:30

मुंबई : बॉम्बे आर्ट सोसायटीच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आणि प्रा. चित्रकार अनिल नाईक यांचे पॅनल बहुमताने निवडून आले.

(Important) Kamat, Naik, majority in Bombay Art Society | (महत्त्वाचे) बॉम्बे आर्ट सोसायटीत कामत, नाईक यांना बहुमत

(महत्त्वाचे) बॉम्बे आर्ट सोसायटीत कामत, नाईक यांना बहुमत

ंबई : बॉम्बे आर्ट सोसायटीच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत आणि प्रा. चित्रकार अनिल नाईक यांचे पॅनल बहुमताने निवडून आले.
अध्यक्षपदासाठी कामत यांना ३०७ तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार विजय राऊत यांना १८४ मते मिळाली. कामत यांच्या पॅनलमधून शिल्पकार चंद्रजीत यादव (चिटणीस), प्रा.सुरेंद्र जगताप (खजिनदार) आणि समितीवर प्रा.अनिल नाईक, प्रा. नरेंद्र विचारे, चित्रकार अजिंक्य चौलकर, माधवी गांगण, निलेश किंकळे, गणपत भडके आणि श्रीकांत कदम यांची निवड झाली. प्रा. दिनकर धोपटे आणि प्रा. प्रकाश राजेशिर्के यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
कोण चुकले यापेक्षा काय चुकले, ते आपण सर्वांनी मिळून सुधारणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया कामत यांनी निकालानंतर दिली. (प्रतिनिधी)

Web Title: (Important) Kamat, Naik, majority in Bombay Art Society