(महत्त्वाचे) धुळ्यात दंगल; २ ठार, ६ जखमी ७० जणांविरुद्ध गुन्हा : क्रिकेट खेळण्यातून दोन गटांत वाद
By Admin | Updated: May 15, 2015 23:33 IST2015-05-15T23:33:25+5:302015-05-15T23:33:25+5:30
धुळे : शहरातील मच्छीबाजार परिसरातील कसाबवाडा येथे शुक्रवारी सायंकाळी तरुणांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादावरुन दोन गटांत दंगल उसळली. सशस्त्र हल्ल्यात अन्सारी अख्तर हुसेन अब्बास (४०) आणि यासीर अन्सारी (३५) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली.

(महत्त्वाचे) धुळ्यात दंगल; २ ठार, ६ जखमी ७० जणांविरुद्ध गुन्हा : क्रिकेट खेळण्यातून दोन गटांत वाद
ध ळे : शहरातील मच्छीबाजार परिसरातील कसाबवाडा येथे शुक्रवारी सायंकाळी तरुणांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादावरुन दोन गटांत दंगल उसळली. सशस्त्र हल्ल्यात अन्सारी अख्तर हुसेन अब्बास (४०) आणि यासीर अन्सारी (३५) यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. दंगलीत सात ते आठ जण जखमी झाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. कसाब वाड्यात राहणार्या युवकांमध्ये दुपारी तीन वाजेच्या सुमारास क्रिकेट खेळण्यावरुन वाद झाला होता. दुपारी वाद मिटविण्यात आला. परंतु सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यावरून पुन्हा वाड्यातील दोन गट आमने - सामने आले. दोन्ही गटांनी एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढविला. घटनेची खबर मिळताच आझाद नगर, धुळे शहर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी पोहचली. त्यांनी तातडीने दंगल आटोक्यात आणली. दंगलप्रकरणी आझाद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरु होते. (प्रतिनिधी)