महत्वाचे - संक्षिप्त बातम्या

By Admin | Updated: December 20, 2015 23:59 IST2015-12-20T23:59:47+5:302015-12-20T23:59:47+5:30

गाडगे बाबा यांची पुण्यतिथी

Important - Brief news | महत्वाचे - संक्षिप्त बातम्या

महत्वाचे - संक्षिप्त बातम्या

डगे बाबा यांची पुण्यतिथी
चासकमान : रयत शिक्षण संस्थेच्या जवाहर विद्यालयात (चास ता. खेड) संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी रविवारी साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षक दशरथ खाडे, डी.एम लाडके, एन.व्ही.बोंबले, विद्यार्थी दिशा नाईकरे, रोहन मुळूक, राजेश गायकवाड,हर्षदा देवदरे, दिव्या मुळूक, सुरभी देवदरे, घनवट मृनाली, सिदधार्थ मुळूक, यश पाटोळे उपस्थित होते.

लक्झरी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
शिरूर : रस्त्याच्या कडेला बुलेट चालू करत असताना पुण्याहून नगरकडे वेगाने जाणार्‍या लक्झरी बसने धडक मारल्याने नितीन मानसिंग काळे (वय २३, रा. घोटीमळा, जुने शिरूर) हा तरुण जागीच ठार झाला.
शनिवार रात्री १० वाजण्याच्या सुमारास शिरूर गावाच्या हद्दीत वैभव हॉटेलसमोर पुण्याहून नगरकडे भरधाव वेगात जाणारी लक्झरी बसने (एमएच २७, एएफ ४५११)जोरदार धडक मारल्याने नितीन जागीच मरण पावला.

शरद पवारांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन
मोरगाव : येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयूरेश्वर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसामुळे यांच्या जीवन प्रवासावर आधारित दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन नुकतेच भरविण्यात आले. चार दिवसांपासून प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

वकिली व्यवसायातील नीतिमत्ता हरवली : धर्माधिकारी
बारामती : न्यायदान प्रक्रियेत वकील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, वकिली हा धंदा बनला आहे. त्यातून गुणवत्ता, नीतिमत्ता हरवली आहे. अन्याय दूर करण्याचे कर्तव्य स्वीकारण्याऐवजी युक्तीवादातून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न दिसून येतो, अशी खंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी यांनी व्यक्त केली. बारामती येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित बारामती, इंदापूर, दौंड वकील परिषदेत ते बोलत होते.

Web Title: Important - Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.