महत्वाचे... जोड

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:35+5:302015-02-20T01:10:35+5:30

अनेक गावातील महिलांचा दारूबंदीसाठी पुढाकार

Important ... attachments | महत्वाचे... जोड

महत्वाचे... जोड

ेक गावातील महिलांचा दारूबंदीसाठी पुढाकार
नरखेड : तालुक्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने महिला त्रस्त आहेत. गावातील अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी एल्गार पुकारला आहे. पोलीस प्रशासनाने या समस्येकडे लक्ष पुरवून गावातील दारू विक्रीला आळा घालावा, अशी महिलांची मागणी आहे.
....
दिशादर्शक फलकांचा अभाव
सावनेर : तालुक्यातील अनेक प्रमुख मार्गावर दिशादर्शक फलक नसल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. शिवाय, अनेक रस्त्यावर असलेल्या दिशादर्शक फलक तुटले असून या फलकांना झुडपांचा विळखा आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
......
अवैध प्रवासी वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष
काटोल : तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जाते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. एकीकडे दुचाकी व चारचाकी वाहनांची कसून तपासणी करणाऱ्या वाहतूक पोलिसांचे या अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अवैध वाहतूक खुलेआम सुरू आहे.
.....
खड्डेमय रस्त्यांमुळे वाहतुकीला अडथळा
मौदा : तालुक्यातील बहुतांश गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. अनेक मार्गावरील डांबरीकरण उखडल्याने गिट्टी उघडी पडली आहे. या रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्या वाहनचालक व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. बांधकाम विभागाने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
.....
कडबा हद्दपार झाल्याने गुरांच्या वैरणाचा प्रश्न
भिवापूर : तालुक्यात ज्वारीचा पेरा कमी प्रमाणात असल्याने कडबा हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. ओलिताची सोय असणारे शेतकरी गुरांना हिरवा चारा चारतात. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा कडबा हद्दपार झाला आहे. ज्वारीच्या पेरणीसाठी कृषी विभागाने विशेष लक्ष पुरविणे गरजेचे आहे.

Web Title: Important ... attachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.