महत्वाचे... जोड

By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:12+5:302015-02-16T21:12:12+5:30

अभियंत्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याचे बांधकाम निकृष्ट

Important ... attachments | महत्वाचे... जोड

महत्वाचे... जोड

ियंत्यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याचे बांधकाम निकृष्ट
कुही : लोकप्रतिनिधींच्या निधीमधून होत असलेल्या तालुक्यातील रस्त्यांच्या बांधकामांकडे संबंधित अभियंत्यांचे दुर्लक्ष सुरू आहे. परिणामी कामाचा दर्जा अतिशय खालावला जात आहे. इस्टिमेटनुसार काम होत नसल्याच्या बाबी पुढे येत आहेत.
.....
शाळांमध्ये क्रीडांगणांचा अभाव
नरखेड : शहर व तालुक्यातील अनेक शाळांमध्ये क्रीडांगणांचा अभाव आहे. विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होत आहे. मात्र ग्रामीण भागात क्रीडांगण नसल्याने यावर पाणी फेरले जात असल्याचे दिसते.
....
अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा
कामठी : आधीच अरुंद रस्ते, त्यावर वाढलेले अतिक्रमण आणि वाहनांची वाढती संख्या अशा स्थितीत शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णत: बिघडली आहे. लहानसहान कारणांवरून वाहनधारकांत वादाचे प्रमाण वाढले आहे. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे.
....
पशुपालनासंदर्भातील योजना कागदावरच
कळमेश्वर : तालुक्यातील पशुधन घटत आहे, ही चिंतेची बाब आहे. शासनाने पशुपालन व्यवसाय करण्याकरिता अर्थसाहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या आहेत. परंतु त्या योजना केवळ कागदोपत्री असल्याचे वास्तव दिसून येत आहे.

Web Title: Important ... attachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.