महत्वाचे... जोड

By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:08+5:302015-02-13T00:38:08+5:30

सार्वजनिक स्थळावरील धूम्रपानास प्रतिबंध घाला

Important ... attachments | महत्वाचे... जोड

महत्वाचे... जोड

र्वजनिक स्थळावरील धूम्रपानास प्रतिबंध घाला
मौदा : शहरातील सार्वजनिक ठिकाणी अनेक नागरिक सर्रासपणे धूम्रपान करतात. त्यामुळे इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. दररोज बसस्थानक, शासकीय कार्यालय आदी ठिकाणी हजारो लोक बिडी, सिगारेट ओढून कायदा मोडत आहेत. त्यामुळे अशांवर कारवाईची मागणी व्यक्त होत आहे.
...
चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत
रामटेक : शहरातील भुरट्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सध्या शहरात दुचाकी वाहने व घरफोडी करणारे चोरटे सक्रिय झाले असून त्यांच्या वाढत्या उपद्रवांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
.....
रस्त्याच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट
पारशिवनी : येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. या बांधकामासाठी रस्त्यालगतचा मुरुम खोदून वापरला जात आहे. शिवाय, काही भागात रस्त्यावरील गिट्टीवर परिसरातील मातीचा थर चढविला जात आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्ती कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे बांधकाम स्थानिक पं.स. सभापतींनी थांबविले होते.

Web Title: Important ... attachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.