महत्वाचे.... जोड

By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:57+5:302015-02-18T00:12:57+5:30

जिल्‘ातील टपालपेट्यांची दुरवस्था

Important ... attachments | महत्वाचे.... जोड

महत्वाचे.... जोड

ल्ह्यातील टपालपेट्यांची दुरवस्था
नागपूर : डाक विभागाकडून जिल्ह्यातील अनेक शहरात ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या टपालपेट्यांची दुरवस्था झाली आहे. अलिकडच्या काही वर्षांपासून दळणवळणाची नवी साधने अस्तित्वात आल्यामुळे टपाल खात्याकडे लोकांचे दुर्लक्ष झाले आहे.
.....
कृषी संजीवनी योजनेपासून शेतकरी वंचित
उमरेड : प्रशासनातर्फे कृषी संजीवनी योजना राबविली जात असली तरी या योजनेचा लाभ अनेक शेतकऱ्यांना झाला नाही. माहितीअभावी अनेक शेतकरी वंचित राहिले. शेतकऱ्यांकडे थकीत असलेल्या एकूण वीज बिलाच्या रकमेपैकी २० टक्केे रक्कम पहिल्या टप्प्यात, २० टक्के दुसऱ्या टप्प्यात व उर्वरित १० टक्के रक्कम तिसऱ्या टप्प्यात भरायची असते. व्याज व दंडसुद्धा माफ केला जाणार आहे.
....
धूळ, रेती व राखेमुळे डोळ्यांचे आजार
खापरखेडा : खापरखेडा-पारशिवनी मार्गावर राख व रेतीचे ट्रक फारशी काळजी न घेता बिनधास्त चालविले जात आहेत. त्यामुळे अन्य प्रवाशांना डोळ्यांचा त्रास होत आहे. शिवाय यामुळे अपघातही घडत आहेत. याकडे पोलीस व महसूल प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी आहे.
....
मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त
कामठी : शहरात मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. वर्दळीच्या रस्त्यांवर ठिय्या मांडणाऱ्या जनावरांमुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. ही बाब नगर परिषदेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही याकडे दुर्लक्ष सुरू आहे.
.....
पांदण रस्त्यांची दैनावस्था
नरखेड : तालुक्यातील शेत शिवारांना जोडणाऱ्या पांदण रस्त्यांची चांगलीच दैनावस्था झाली आहे. अनेक पांदण रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून त्यामुळे शेतात जाणे कठीण होत आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.
....
ग्रामीण भागात दारुविक्रीला ऊत
काटोल : शहरासह ग्रामीण भागातही दारुविक्री सध्या जोरात सुरू आहे. पोलीस कारवाई करतात, मात्र पुन्हा दारुविक्रेते सक्रिय होत असल्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करण्याची मागणी व्यक्त होत आहे.
....
मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त
हिंगणा : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही कुत्री धावत्या वाहनांवर धावून चावा घेतात. त्यामुळे अनेकदा दुचाकी वाहनांचे अपघात घडतात. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Important ... attachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.