महत्वाचे जोड....
By Admin | Updated: December 19, 2014 22:56 IST2014-12-19T22:56:53+5:302014-12-19T22:56:53+5:30
मोहपा येथे हत्तीरोग दुरीकरण मोहीम

महत्वाचे जोड....
म हपा येथे हत्तीरोग दुरीकरण मोहीममोहपा : स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हत्तीरोग दुरीकरण मोहीम राबविण्यात आली. मोहिमेंतर्गत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन डीईसी व अल्बेडाझील गोळ्यांचे वाटप केले. मोहिमेस वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता उके व आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. .....व्यापाऱ्यांची हरविलेली रक्कम पोलिसांनी केली परतहिंगणा : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेठ शिवारात एका ढाब्यानजीक गस्तीदरम्यान ठाणेदार व कर्मचाऱ्यांना रक्कमेची बेवारस बॅग आढळली. बॅगेतील कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी सदर बॅग वाशीम जिल्ह्यातील एका व्यापाराची असल्याचा शोध लावला. लागलीच सदर व्यापारी गिरीश लाहोटी यांना बोलावून पोलिसांनी बॅगेतील एक लाख रुपये रोख परत केली.