महत्वाचे....

By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:24+5:302015-01-23T01:05:24+5:30

बेलोना-नरखेड रस्त्याची दुर्दशा

Important .... | महत्वाचे....

महत्वाचे....

लोना-नरखेड रस्त्याची दुर्दशा
बेलोना : बेलोना-नरखेड या रस्त्याची चांगलीच दुर्दशा झाली आहे. सदर मार्ग नागपूर-अमरावती या मार्गाला जोडणारा असून मार्गात वर्दळ अधिक प्रमाणात असते. मात्र, रस्त्याच्या दैनावस्थेमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
.......
बुटीबोरीतील मुख्य रस्त्याचे काम संथगतीने
बुटीबोरी : स्थानिक मुख्य रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम प्रशासनाने हाती घेतले. मात्र, सदर रस्त्याचे काम अतिशय संथगतीने होत असल्याने वाहनचालक व नागरिकांना रस्त्यातील धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचे दुरुस्तीकाम तातडीने करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
....
निर्मलग्राम योजनेसाठी ग्रामस्थ उदासीन
भिवापूर : तालुक्यातील बहुतांश गावात अद्यापही उघड्यावर शौचास बसण्याचा प्रकार सुरू आहे. पंचायत समितीमार्फत राबविल्या जाणाऱ्या निर्मलग्राम योजनेत ग्रामस्थांची उदासीनता दिसून येत आहे. यात अनेक पुरस्कारप्राप्त गावांचा समावेश आहे. या योजनेच्या माध्यमाने गावात स्वच्छताविषयक माहिती देऊन ग्रामस्थांमध्ये जनजागृतीची गरज आहे.
.......
भारनियमनामुळे ओलिताची समस्या
बेलोना : वीज वितरण कंपनीने परिसरात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या ओलिताची समस्या निर्माण होत आहे. दिवसा विद्युत पुरवठा बंद असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या सुमारास पिकांचे ओलित करावे लागते. अशावेळी शेतकऱ्यांना थंडी व वन्यप्राण्यांचा सामना करावा लागतो. परिसरात दिवसाला होणारे भारनियमन बंद करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Web Title: Important ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.