महत्वाचे...
By Admin | Updated: February 13, 2015 00:38 IST2015-02-13T00:38:22+5:302015-02-13T00:38:22+5:30
दासनवमी उत्सव आज

महत्वाचे...
द सनवमी उत्सव आजअकोला: येथील रघुवीर मठ यांच्यावतीने शुक्रवारी ३३३ व्या दासनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.पथदिवे सुरू कराअकोला: आकोट मार्गावरील उड्डाण पुलावरचे पथदिवे बंद असल्यामुळे आकोट फैल भागाकडे जाणार्या पादचार्यांना रात्री त्रास सहन करावा लागतो. पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी बुधवारी निवेदनाद्वारे केली.शोभायात्रेतील मंडळांचा सत्कारअकोला: येथील रामनवमी शोभायात्रेत सहभागी झालेल्या ७२ मंडळ, १४ भजनी दिंड्या व १३६ रामसेवकांचा राणी सती धाम येथे शुक्रवारी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.हरिकीर्तन सप्ताह सोहळाअकोला: अयोध्यानगर येथे श्रीमद् भागवत सप्ताह व हरिकीर्तन सप्ताह सोहळ्याची सांगता बुधवारी झाली. हभप अनंत बा. कुळकर्णी यांच्या मधुर वाणीतून भाविकांनी भागवत कथा श्रवण केली. महाप्रसादाने समारोप झाला.कर्मचार्यांचे धरणे आंदोलनअकोला: रा. प. कर्मचार्यांनी प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट ॲन्ड सेफ्टबिल २०१४ यातील जाचक अटींचा विरोध करण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासोर बुधवारी धरणे आंदोलन केले. यात उमाकांत कवळे, विनायक वडाळ, खान, गाडगे, वडवे, पाटकरी आदींचा समावेश होता.