महत्त्वाचे
By Admin | Updated: January 29, 2015 23:16 IST2015-01-29T23:16:59+5:302015-01-29T23:16:59+5:30
महत्वाचे

महत्त्वाचे
म त्वाचे महिला मेळावा व लघुउद्योग मार्गदर्शन शिबिरनागपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, ललित कला भवन चंदननगर येथे महिला मेळावा व लघुउद्योग मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन मंडळाचे सहा. कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाला कल्पना पांडे, संजिवनी चौधरी, कुंदा नागपूरे उपस्थित होते. शिबीरात महिलांना शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. धर्मनिरपेक्ष व समाजवादी शब्द वगळण्याचा निषेधनागपूर : सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे दोन शब्द वगळ्यात आले आहे. हा बदल भाजपाचा नव्हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा एजेंडाचा भाग आहे. या प्रकाराचा भारतीय दलित पँथरने निषेध केला आहे. बहुउद्देशीय आरोग्य सेवक प्रशिक्षणार्थींचा सत्कारनागपूर : बहुउद्देशीय आरोग्य सेवकांच्या परीक्षेत नागपुरातील विनोद गजभिये, भानुदास झाडे व कांचन पगार हे राज्यातून पहिल्या तीन क्रमांकावर आले आहे. नागपुरात राज्य प्रशिक्षण धोरण विषय कार्यशाळेत या तिघांचा सत्कार उपसंचालक डॉ. तानाजी माने यांच्याहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला श्याम निमगडे, डॉ. पी. आर. जक्कल, नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल उपस्थित होते. नवयुग शाळेत मातृशक्ती संमेलननागपूर : राजाबाक्षा येथील नवयुग प्रा. शाळेत मातृशक्ती संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण समुपदेशक उज्ज्वला पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. तसेच प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नितीन विघ्ने, ऋचा हळदे, गुणवंत नागेलवार उपस्थित होते. डॉ. विघ्ने यांनी मातापालकांना शिशुचे संगोपन, व्यक्तिमत्त्वाचा विकास यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. बुनकर पावरलूम असो. आमदाराला निवेदन नागपूर : एपीएल कार्डधारक चार महिन्यापासून रेशनपासून वंचित आहेत. सिलेंडरच्या वितरण प्रणातील गोंधळामुळे सामान्य जनता त्रस्त आहेत. सामान्य जनतेला केरोसिन मिळणे कठीण झाले आहे. यासह अन्य मागण्यासाठी बुनकर पावरलुम असो. चे अध्यक्ष सदरुद्दीन अंसारी यांच्यासह शिष्टमंडळाने आ. विकास कुंभारे यांची भेट घेऊन, त्यांना समस्येचे निवेदन दिले. गांधीबाग येथे ताजुद्दीनबाबा जन्मोत्सव साजरानागपूर : हिंदू-मुस्लीम नवयुवक एकता कमिटीतर्फे ताजुद्दीनबाबांचा जन्मोत्सव गांधीबाग येथील फवारा चौक येथे साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष इकबाल अहमद, मोबिन पटेल यांच्याहस्ते ५१ किलोचा केक कापण्यात आला. यावेळी हेमंत पुरजवार, अशफाक पटेल, अनिल बत्तीनवार, रूपेश आदमने, इसराईल खान, सारीक बगड आदी उपस्थित होते.