महत्वाचे....

By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:17+5:302015-02-20T01:10:17+5:30

आंब्याच्या मोहराने फुलला ग्रामीण परिसर

Important .... | महत्वाचे....

महत्वाचे....

ब्याच्या मोहराने फुलला ग्रामीण परिसर
कामठी : दरवर्षीच्या प्रमाणापेक्षा या वर्षी ग्रामीण भागातील आंब्याला अधिक प्रमाणात मोहोर आला आहे. कामठी-घोरपड मार्गावरील आमराईचा भाग एखाद्या नववधूप्रमाणे फुलल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात गावरान आंबा अधिक प्रमाणात मिळणार असल्याचे दिसून येत आहे.
....
गॅस बुकिंगसाठी ग्राहकांना त्रास
नागपूर : ग्रामीण भागातील विविध गॅस एजेंसीअंतर्गत गॅस सिलिंडरच्या बुकिंगकरीता ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोबाईलवरून बुकिंग होत नसल्याची ग्राहकांची ओरड आहे. सदर समस्या सोडविण्यासाठी गॅस ग्राहकांची मागणी आहे.
....
ब्राह्मणी येथे अखंड हरिनाम सप्ताह
कळमेश्वर : तालुक्यातील ब्राह्मणी येथील हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास नुकतीच सुरुवात करण्यात आली. सप्ताहात दररोज ज्ञानेश्वरी पारायण, भजन, हरिपाठ, प्रचवचन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित असून सप्ताहाचा अधिकाधिक भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर कमिटीने केले आहे.
....
हॅण्डपंपाचे पाणी मुख्य रस्त्यावर
मेंढला : गावात असलेल्या हॅण्डपंपाचे पाणी रस्त्यावर पसरत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण होते. ग्रामस्थांच्या सुविधेसाठी हॅण्डपंप बसविण्यात आला; परंतु नाली काढली नाही. त्यामुळे पंपाचे पाणी थेट मुख्य रस्त्यावर पोहोचते. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष पुरवून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
....
कृषी पंपासाठी शेतकऱ्यांना वीज कनेक्शन द्या
नांद : परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी वीज कंपनीकडे डिमांड जमा केले. परंतु, अद्यापही शेतकऱ्यांना वीज कनेक्शन न मिळाल्याने ओलिताची समस्या निर्माण होते. त्यामुळे वीज कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Web Title: Important ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.