महत्वाचे

By Admin | Updated: February 13, 2015 23:11 IST2015-02-13T23:11:11+5:302015-02-13T23:11:11+5:30

नगरसेवकाच्या दबावात आशीनगर झोनचे काम सुरू

Important | महत्वाचे

महत्वाचे

रसेवकाच्या दबावात आशीनगर झोनचे काम सुरू
नागपूर : आशीनगर झोनच्या अधिकाऱ्यांवर स्थानिक नगरसेवक बेकायदेशीर काम करण्यास दबाव आणत असल्याचा आरोप भाजपाच्या अल्पसंख्यक आघाडीने केला आहे. यासंदर्भात आघाडीचे महामंत्री इब्राहिम खान यांच्या नेतृत्वात सहायक अभियंता हरीश राऊत यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी कमीलउद्दीन मलिक, शेख सलीम उपस्थित होते.
काँग्रेसचे अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याला निवेदन
नागपूर : शहर काँग्रेस कमिटीचे सचिव जॉन थॉमस व नगरसेवक योगेश तिवारी यांच्या नेतृत्वात अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांना, जनतेच्या समस्येसंदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी दिलीप प्रेमबंधु, प्रकाश अंथोनी, रामास्वामी नायडू, प्रवीण चव्हाण, संतोषी साहू, संगीता वर्मा आदी उपस्थित होते.
सरस्वती साधना समारोह संपन्न
नागपूर : नागपूर गुजराती ब्रह्मसमाजातर्फे सरस्वती साधना समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला डॉ. विनोद आसुदाणी, चंद्रकांत ठक्कर, अशोक त्रिवेदी, योगेश जोशी, निलेश ठाकर, आर. डी. मेहता उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला नरेश त्रिवेदी, अशोक जहाँ, संजय ठाकर, महेश शुक्ला, चेतन जोशी आदी उपस्थित होते.

बौद्ध धम्मावर जपानी भिक्षू संघाचे प्रवचन
नागपूर : अमरज्योती बुद्ध विहार, नारा रोड येथे बौद्ध धम्मावर जपानी भिक्षू संघाचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यात भदन्त कोशो तानी, पञ्ञा मेत्ता, भदन्त एन्यु मुराखामी, भदन्त सोंझे आराही, भदन्त संघरत्न माणके, भिक्षुणी मेओजित्सो, प्रा. डॉ. अंगराज चौधरी, डॉ. बालचंद्र खांडेकर उपस्थित होते.

मातंग समाजाला कायमस्वरूपी दुकान द्या
नागपूर : मातंग शक्ती संघटनेच्या वतीने शंकर वानखेडे यांच्या नेतृत्वात पालकमंत्र्यांची भेट घेण्यात आली. मातंग समाजाला चिंधीबाजार शनिवारी, संत्रा मार्केट येथील जागेवर कायमस्वरूपी दुकान द्यावे, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली. यावेळी अमोल खंडारे, सरस्वती सोनी, अजाबराव खडसे, मीरा आठवले, रंजना सनेश्वर आदी उपस्थित होते.

Web Title: Important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.