डाळींची आयात करणार
By Admin | Updated: June 16, 2016 03:23 IST2016-06-16T03:23:53+5:302016-06-16T03:23:53+5:30
बाजारात डाळींचे भाव वाढत चालले असून ते १७० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहेत. या पार्श्वभूमीवर म्यानमार आणि आफ्रिका या देशांतून डाळींची आयात करून महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी

डाळींची आयात करणार
नवी दिल्ली : बाजारात डाळींचे भाव वाढत चालले असून ते १७० रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहेत. या पार्श्वभूमीवर म्यानमार आणि आफ्रिका या देशांतून डाळींची आयात करून महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी बफर स्टॉक आणखी मजबूत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
अन्न धान्याच्या वाढत्या दराचा आढावा घेण्यासाठी बुधवारी एक उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली, कृषिमंत्री राधामोहनसिंग, अन्नमंत्री रामविलास पासवान, वाहतूकमंत्री नितीन गडकरी, वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन, शहर विकासमंत्री एम. वेंकय्या नायडू उपस्थित होते. सध्या बाजारात डाळींचे भाव १७० रुपये प्रतिकिलो, तर टोमॅटोचे भावही १०० रुपये प्रतिकिलोच्या आसपास पोहोचले आहेत. ही दरवाढ होण्याची कारणे आणि दरवाढ रोखण्याचे पर्याय यावर प्रामुख्याने बैठकीत चर्चा झाली. डाळींची जास्त मागणी असलेल्या राज्यांसाठी बफर स्टॉकमधून डाळींचा अतिरिक्त पुरवठा करणे या बाबींवर बैठकीत चर्चा झाली.