जाहीरनाम्यावर अंमल केजरीवालांची रूपरेषा मुख्य सचिवांना आदेश
By Admin | Updated: February 11, 2015 23:19 IST2015-02-11T23:19:53+5:302015-02-11T23:19:53+5:30
नवी दिल्ली : दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी दिल्लीचे मुख्य सचिव डी.एम. सपोलिया यांना आम आदमी पार्टीचा ७० कलमी जाहीरनामा सोपवत अंमलबजावणीसाठी रूपरेषा तयार करण्याचा आदेश दिला आहे.

जाहीरनाम्यावर अंमल केजरीवालांची रूपरेषा मुख्य सचिवांना आदेश
न ी दिल्ली : दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी दिल्लीचे मुख्य सचिव डी.एम. सपोलिया यांना आम आदमी पार्टीचा ७० कलमी जाहीरनामा सोपवत अंमलबजावणीसाठी रूपरेषा तयार करण्याचा आदेश दिला आहे.वीजदरात ५० टक्के कपात, शहरात मोफत वाय-फाय, १० ते १५ लाख सीसीटीव्ही कॅमेरे आदी घोषणांचा त्यात समावेश आहे. दिलेल्या घोषणांची अंमलबजावणी कशी करायची, याबाबत १९ फेब्रुवारीपर्यंत सादरीकरण देण्याचा आदेश त्यांनी सर्व विभागांना दिला असल्याचे आपचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी सांगितले. सपोलिया यांनी विठ्ठलभाई पटेल हाऊस येथे केजरीवालांची भेट घेतली.