शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

न्यायमूर्तींशी हुज्जतीनंतर महाभियोग याचिका मागे, घटनापीठ कोणी नेमले हे सांगण्याचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:48 AM

सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांच्यावर महाभियोग चालविण्यासाठी दिलेली नोटीस फेटाळण्याच्या राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांच्या निर्णयाविरुद्ध दोन काँग्रेस खासदारांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी मंगळवारी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे जोरदार खडाजंगी झाली.

नवी दिल्ली : सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांच्यावर महाभियोग चालविण्यासाठी दिलेली नोटीस फेटाळण्याच्या राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांच्या निर्णयाविरुद्ध दोन काँग्रेस खासदारांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी मंगळवारी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे जोरदार खडाजंगी झाली. मुळात हे घटनापीठ कोणी व कोणत्या अधिकारात गठित हे आधी स्पष्ट व्हायला हवे, यावरून वकिलांनी न्यायमूर्तींशी हुज्जत घातली.या मुद्द्यात न शिरता वकिलांनी गुणवत्तेवर युक्तिवाद करावा, यावर न्यायमूर्ती ठाम राहिले पण वयाचिकाकर्त्यांच्या वकिलांनी याचिकाच मागे घेतल्याने या तणातणीवर अचानक पडदा पडला.प्रताप सिंग बाजवा (पंजाब) व डॉ. अमी हर्षद्रेय याज्ञिक या दोन राज्यसभा सदस्यांनी केलेल्या याचिकेच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीशांनी सोमवारी सायंकाळी तातडीने न्या. ए. के. सिक्री, न्या.शरद बोबडे, न्या. एन. व्ही. रमणा, न्या. अरुण मिश्रा आणि न्या. ए. के. गोयल यांचे घटनापीठ स्थापन केले. अत्यंत उत्कंठापूर्ण वातावरणात सकाळी १०.३० वाजता याचिका सुुनावणीसाठी पुकारली गेली. पण केवळ अर्धा-पाऊण तासांत सुनावणी संपली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बलयांनी याचिकेच्या गुणवत्तेत शिरण्यापूर्वी आपल्यालाकाही प्राथमिक पण मुलभूत मुद्दे उपस्थित करायचे असल्याचे स्पष्ट केले. ही याचिका नेहमीच्या प्रथेप्रमाणे दोन वा तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे न जाता थेट पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे कशी आली? हा निर्णय कोणी घेतला? कोणत्या अधिकारात घेतला? याचा खुलासा सर्वप्रथम केला जावा, असा त्यांचा आग्रह होता.न्या. सिक्री, न्या. बोबडे व न्या. गोयल यांनी घटनापीठ कोणी नेमले हा मुद्दा गैरलागू आहे व आम्ही त्यात पडू इच्छित नाही आणि पडू शकतही नाही, असे स्पष्ट केले. घटनापीठ कोणी नेमले हे जाणून घेऊन तुम्ही काय करणार? त्यातून काय साध्य होणार? असाही त्यांचा सिब्बल यांना सवाल होता. सिब्बल यांचे त्यावर म्हणणे होते की, घटनापीठ स्थापण्याच्या निर्णयाची प्रत आम्हाला द्या, म्हणजे मग आम्हाला त्या निर्णयासही आव्हान देता येईल.नोटीस ६४ जणांची, याचिका दोघांचीचराज्यसभा सभापतींच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ उभे राहिले व त्यांनी याचिकेसच आक्षेप घेतला. ही नोटीस राज्यसभेच्या ६४ सदस्यांनी दिली होती व याचिका त्यापैकी फक्त दोघांनीच केली आहे, याकडे लक्ष वेधून ते म्हणाले की, एक तर राज्यघटनेनुसार नोटीस देण्यासाठी जेवढे किमान सदस्य (५०) लागतात तेवढ्यांनी याचिका करायला हवी किंवा ५० जणांचे संमतीपत्र घेऊन त्याहून कमी सदस्यांनी ती करावी. यावरूनही सिब्बल यांनी ‘असा कुठे नियम नाही’, असे म्हणत वाद घातला व आता ६४ सदस्यांच्या सहीची याचिका घेऊन येतो, असे सांगितले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDeepak Mishraदीपक मिश्राCourtन्यायालय