‘तात्काळ’ची निम्मी तिकिटे चढय़ा भावाने
By Admin | Updated: October 2, 2014 23:54 IST2014-10-02T23:54:50+5:302014-10-02T23:54:50+5:30
रेल्वेने तात्काळ कोटय़ातील 50 टक्के तिकिटांना ‘डायनॅमिक फेअर सिस्टिम’ लागू केल्याने प्रवाशांना आता ही तिकिटे चढय़ा दराने खरेदी करावी लागणार आहेत.

‘तात्काळ’ची निम्मी तिकिटे चढय़ा भावाने
>नवी दिल्ली : रेल्वेने तात्काळ कोटय़ातील 50 टक्के तिकिटांना ‘डायनॅमिक फेअर सिस्टिम’ लागू केल्याने प्रवाशांना आता ही तिकिटे चढय़ा दराने खरेदी करावी लागणार आहेत. भाडे आकारणीची ही नवी पद्धत बुधवार 1 ऑक्टोबरपासून लागू झाली असून त्यामुळे सणासुदीच्या हंगामात ऐनवेळी प्रवास करावा लागणा:यांचा हिरमोड होणार आहे.
रेल्वे खात्याच्या एका वरिष्ठ अधिका:याने सांगितले की, देशभरात धावणा:या 8क् निवडक रेल्वेगाडय़ांसाठी ही ‘प्रीमियम तात्काळ तिकीट योजना’ 1 ऑक्टोबरपासून लागू झाली असून या तिकिटांचे फक्त ऑनलाइन बुकिंग करता येईल. प्रत्येक विभागीय रेल्वेला यासाठी प्रत्येकी पाच गाडय़ा निवडण्यास सांगण्यात आले आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.
या योजनेनुसार प्रत्येक गाडीत तात्काळ कोटय़ात उपलब्ध असलेल्या एकूण तिकिटांपैकी पहिली 5क् टक्के तिकीटे नेहमीच्या तात्काळ तिकिटांच्या दराने उपलब्ध होतील. त्यानंतरची 5क् टक्के तिकिटे ‘डायनॅमिक प्रायसिंग’ पद्धतीने विकली जातील. म्हणजे मागणी जेवढी जास्त तेवढी किंमत जास्त हे तत्व लागू होईल.
रेल्वे तिकिटांच्या काळ्य़ाबाजारास आळा घालण्याचा हा एक उपाय असल्याचे रेल्वेचे म्हणणो आहे. अगदी निकड म्हणून प्रवास करू इच्छिणा:या प्रवाशांची काळाबाजार करणा:या दलालांकडून लूट केली जाते, असे लक्षात आल्याने ही योजना सुरु करण्यात आल्याचे हा अधिकारी म्हणाला.
गेल्या एप्रिलमध्ये रेल्वेने तात्काळ तिकिटांचे दर दुस:या वर्गाच्या आरक्षित आसनाच्या दराच्या 1क् टक्क्यांनी व इतर सर्व वर्गासाठी 3क् टक्क्यांनी वाढविले होते. आता ही नवी योजना लागू केल्याने तात्काळ कोटय़ातील निम्मी तिकिटे याहूनही महागणार आहेत. याखेरीज तीन प्रीमियम रेल्वेगाडय़ांची सर्व आरक्षित तिकिटेही अशाच ‘डायनॅमिक फेअर सिस्टिम’ने विकली जात आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4एखाद्या गाडीच्या तिस:या वर्गाच्या वातानुकूलित डब्यात तात्काळ कोटय़ाची एकूण 6क् तिकिटे उपलब्ध असतील तर त्यातील 3क् तिकिटे नेहमीच्या तात्काळ तिकिटाच्या दराने विकली जातील.
4 राहिलेल्या 3क् तिकिटांपैकी 1क् टक्के म्हणजे तीन तिकिटे 2क् टक्के चढय़ा दराने मिळतील.
4यानंतर शिल्लक राहिलेल्या 27 तिकिटांपैकी 1क् टक्के तिकिटांना आणखी 2क् टक्के चढा दर लागू होईल.
4अशा प्रकारे कोटय़ातील शेवटचे तिकीट विकले जाईर्पयत भाडे चढय़ा दराने वाढत जाईल.