'पेट्रोल-डिझेल दरवाढ तत्काळ मागे घ्या', इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची देशव्यापी निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 06:13 AM2021-06-12T06:13:15+5:302021-06-12T06:14:25+5:30

Congress : कोरोनासाठीचे निर्बंध मागे घेतले गेल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते, नेते शुक्रवारी देशभर रस्त्यांवर दिसले. एनएसयूआय, युवक काँग्रेस, महिला काँग्रेसशिवाय पक्षाचे मोठे नेते या आंदोलनात सहभागी होते.

'Immediate withdrawal of petrol-diesel price hike', nationwide protests by Congress against fuel price hike | 'पेट्रोल-डिझेल दरवाढ तत्काळ मागे घ्या', इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची देशव्यापी निदर्शने

'पेट्रोल-डिझेल दरवाढ तत्काळ मागे घ्या', इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसची देशव्यापी निदर्शने

googlenewsNext

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : पेट्रोल -डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात देशव्यापी निदर्शने करून काँग्रेसने मोदी सरकारकडे वाढत्या किमती ताबडतोब मागे घेण्याची मागणी केली. पक्षाची हीदेखील मागणी केली की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घट ग्राहकांपर्यंत दिली जावी. अनियंत्रित वाढलेली एक्ससाइज़ ड्युटी रद्द करून पेट्रोल, डिझेलला वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) आणावे.

कोरोनासाठीचे निर्बंध मागे घेतले गेल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते, नेते शुक्रवारी देशभर रस्त्यांवर दिसले. एनएसयूआय, युवक काँग्रेस, महिला काँग्रेसशिवाय पक्षाचे मोठे नेते या आंदोलनात सहभागी होते. मोदी सरकारविरोधात लोकमत जागृत करण्याच्या हेतूने पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्व सहयोगी पक्षांना मोदी सरकारविरोधात मोहीम सुरू करण्याचे आवाहन केले होते. 

रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ‘भाजप भारतीय जानलूट पार्टी बनली आहे. सरकारी नफेखोरी, भाजपाई जिझिया टॅक्स, मोदीजी तुम्ही, आकाशातून लवकर परत या, आम्हाला जमिनीवरील प्रश्नांवर बोलायचे आहे.’ केंद्र सरकारने जर अबकारी शुल्क नऊ रुपयांपर्यंत कमी केले तर इंधनाच्या दरात २५ रुपये प्रति लिटर कपात होऊ शकते, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले. 

राहुल गांधी म्हणाले...
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘जीडीपी मरून जात आहे, बेरोज़गारी वाढत आहे, तेलाचे भाव आकाशाला स्पर्श करीत आहेत, भाजपचे लुटो भारतच्या पद्धती वेगळ्या आहेत.’ 

प्रियांका गांधी म्हणाल्या...
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्वीट करून म्हटले की, ‘महामारीत मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलमधून वसूल केले. २.४ लाख कोटी रुपये. या पैशांतून काय मिळू शकले असते? तर पूर्ण भारताला ६७,००० कोटी लस, ७१८ जिल्ह्यांना ऑक्सिजन प्लांट, २९ राज्यांना एम्स रुग्णालये, २५ कोटी गरिबांना सहा हजार रुपयांची मदत, पण हे मिळाले नाही.”

Web Title: 'Immediate withdrawal of petrol-diesel price hike', nationwide protests by Congress against fuel price hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.