शौचालयांना त्वरित दरवाजे बसवा शाहू नगरातील नागरिकांची मागणी: मनपावर आणला मोर्चा
By Admin | Updated: August 16, 2016 22:23 IST2016-08-16T22:23:05+5:302016-08-16T22:23:05+5:30
जळगाव: शाहू नगरातील महिला व पुरुष शौचालयांना दरवाजेच नसल्याने गैरसोय होत असून परिसरात सफाई होत नसल्याने तसेच शौचालयाचे पाणी गटारी तुंबून रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या शौचालयांना त्वरित दरवाजे बसवावेत तसेच परिसरात तातडीने सफाई करण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी मंगळवारी मनपावर मोर्चा आणला. महापौर नितीन ला यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महापौरांनी तातडीने समस्या दूर करण्याचे आदेश आरोग्याधिकार्यांना दिले.

शौचालयांना त्वरित दरवाजे बसवा शाहू नगरातील नागरिकांची मागणी: मनपावर आणला मोर्चा
ज गाव: शाहू नगरातील महिला व पुरुष शौचालयांना दरवाजेच नसल्याने गैरसोय होत असून परिसरात सफाई होत नसल्याने तसेच शौचालयाचे पाणी गटारी तुंबून रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या शौचालयांना त्वरित दरवाजे बसवावेत तसेच परिसरात तातडीने सफाई करण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी मंगळवारी मनपावर मोर्चा आणला. महापौर नितीन ला यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महापौरांनी तातडीने समस्या दूर करण्याचे आदेश आरोग्याधिकार्यांना दिले. शाहू नगरात पुरुषांचे १८ तर महिलांचे १८ सार्वजनिक शौचालय आहेत. मात्र त्यांचे दरवाजे गायब आहेत. त्यामुळे नागरिकांची विशेषत: महिला वर्गाची गैरसोय होते. तसेच या शौचालयांचे आऊटलेटही खराब झाल्याने शौचालयाचे घाण पाणी गटारीतून रस्त्यावर पसरते. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. तसेच या परिसरात नियमित साफसफाईच होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जळगाव जागृत जनमंचतर्फे शिवराम पाटील, अनिल नाटेकर, राहुल सूर्यवंशी यांच्यासह नागरिकांनी मनपावर मोर्चा आणला. महापौर नितीन ला यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन समस्या मांडली. त्यावर महापौरांनी आरोग्याधिकार्यांना बोलावून तातडीने दरवाजे बसविण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या परिसरात सफाई मोहीम राबविण्याचे आदेश दिले. -----शौचालयांच्या नावाने वसुलीमनपा आरोग्य विभागातील कर्मचार्यांनी शाहू नगरातील महिलांकडून महाराष्ट्र स्वच्छता अभियानांतर्गत शौचालय बांधण्याच्या नावाखाली प्रत्येकी २ हजार रुपयांची वसुली केली. मात्र त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला की नामंजूर त्याची सुद्धा माहिती दिलेली नाही, अशी तक्रार यावेळी करण्यात आली. त्यावर महापौरांनी नावानिशी तक्रार करा, दोषी आढळल्यास संबंधित कर्मचार्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.