शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

'मी माझा फोन द्यायला तयार, मला टॅप करण्याची भीती वाटत नाही'; अ‍ॅपलच्या अलर्टवर राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 16:26 IST

फोन टॅपिंगच्या आरोपांदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर आरोप केले आहेत.

अ‍ॅपलचा आयफोन वापरणारे खासदार असदुद्दीन ओवेसी, महुआ मोईत्रा, शशी थरूर आणि राघव चढ्ढा यांच्यासह अनेक नेत्यांनी मंगळवारी एक अलर्ट संदेश शेअर केला आणि आरोप केला की ते टॅप केले जात आहेत. ओवेसीसह अनेक नेत्यांनी अ‍ॅपलचा चेतावणी संदेश शेअर केला होता, ज्यात लिहिले होते - अ‍ॅपलला वाटते की राज्य प्रायोजित हल्लेखोरांकडून तुम्हाला लक्ष्य केले जात आहे. कदाचित हल्लेखोर तुमच्यावर वैयक्तिक हल्ला करत असतील. तुमचे कामही याला कारण असू शकते. मात्र, आता याबाबत अ‍ॅपलचे वक्तव्य समोर आले असून, हे खोटे इशारे असून सरकारने असे काहीही केले नसल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही यावरुन आता सरकारवर आरोप केले आहेत. गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. फोन टॅपिंगला मी घाबरत नाही, असे ते म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की, केसी वेणुगोपाल, पवन खेडा, सीताराम येचुरी यांच्यासह अनेक नेत्यांना असे अलर्ट आले आहेत. 'भाजप आणि अदानी यांच्याविरोधात फार कमी लोक लढत आहेत. तुम्हाला पाहिजे तेवढा फोन तुम्ही टॅप करू शकता. मला त्याची पर्वा नाही. तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला माझा फोन देऊ शकतो. आम्ही घाबरत नाही आणि लढायला तयार आहोत, असंही राहुल गांधी म्हणाले. 

'नरेंद्र मोदी सरकारचा आत्मा अदानी समूहासोबत असल्याचा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला. अदानींवर प्रश्न उपस्थित होताच ईडी आणि सीबीआय सक्रिय होतात.  संपूर्ण देशाचे आणि संपूर्ण विरोधकांचे डोळे अदानींकडे लागले असून सरकार जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही गांधी यांनी केला. 'मोदी सरकारमध्ये अदानी पहिल्या क्रमांकावर आणि नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मोदींचा आत्मा अदानींमध्ये आहे, म्हणूनच त्यांनी अदानींसाठी कृषी कायदा केला. विमानतळ, बंदरे, सिमेंट कारखाने आणि इतर पायाभूत सुविधा अदानींकडे सोपवण्यात आल्या आहेत, असंही गांधी म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले, अदानी यांची मक्तेदारी झाली असून त्यामुळे देशातील तरुणांचे नुकसान होत आहे. देशातील जनतेचा पैसा हिसकावून अदानींना दिला जात आहे. जात जनगणनेशिवाय देशात काहीही होऊ शकत नाही,देशातील जनता अदानींकडून वीज विकत घेते, कोळशापासून वीज निर्माण होते आणि कोळसा अदानींकडे दिला जातो. जनतेवर मनमानी कर लादून अदानी मोदी सरकारकडून पैसे उकळत असून देशातील दलित-आदिवासींचा पैसा लुटला जात आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी