शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

'ड्रीम अमेरिका' पूर्ण करण्यासाठी ५५ लाख खर्च केले; ८ महिन्यात दोनदा डिपोर्ट झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 11:09 IST

अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांच्या दुसऱ्या तुकडीत नवदीपला आणण्यात येणार होते. मात्र तो आजारी पडला त्यामुळे तिसऱ्या तुकडीत त्याला भारतात आणण्यात आले असं त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली - अमेरिकेत अवैध वास्तव्य करणाऱ्या भारतीयांनाभारतात पाठवण्यात आलं आहे. रविवारी संध्याकाळी अमेरिकेतून तिसरं विमान भारतात पोहचले. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा कारभार हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकूण ३३२ भारतीयांना अमेरिकेतून डिपोर्ट करण्यात आले आहे. 'ड्रीम अमेरिका'चं स्वप्न घेऊन अनेक तरूण लाखो रुपये खर्च करून अवैधरित्या अमेरिकेत पोहचले होते परंतु आता त्या सर्वांना माघारी परतावं लागलं आहे. 

पंजाबच्या फिरोजपूर इथं राहणाऱ्या नवदीपची कहाणी अशीच आहे ज्याने अमेरिकेला जाण्यासाठी दोनदा मोठी रक्कम खर्च केली परंतु दोन्ही वेळा नशिबाने त्याला साथ दिली नाही. नवदीपचे वडील काश्मीर  सिंह यांनी म्हटलं की, मागील ८ महिन्यात २ वेळा आम्ही त्याला अमेरिकेत पाठवण्यासाठी जवळपास ५५ लाख खर्च केले मात्र दोन्ही वेळा नशिबाने साथ दिली नाही. अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांच्या दुसऱ्या टप्प्यात नवदीपला आणण्यात येणार होते. मात्र तो आजारी पडला त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात त्याला भारतात आणण्यात आले असं त्यांनी सांगितले.

वडील चालवतात मिठाईचं दुकान

नवदीपच्या वडिलांचे छोटे मिठाईचं दुकान आहे. त्यांचा मुलगा नवदीप पदवीधर आहे. तो कधी कधी वडिलांच्या कामातही मदत करायचा मात्र मिठाईच्या दुकानात काम करायला त्याला लाज वाटायची. त्याने नोकरी करावी असं त्याच्या घरच्यांना वाटत होते मात्र नवदीपला अमेरिकेत जायचे होते. नवदीपच्या हट्टापायी मागील वर्षी वडिलांनी जमीन विकून ४० लाख रूपये जमा केले होते. नातेवाईकांकडूनही काही पैसे उधारी घेतले होते परंतु पनामा शहरात त्यांच्या मुलाला अटक करण्यात आली त्याच्या काही दिवसांनी नवदीपला भारतात डिपोर्ट करण्यात आले.

...अन् पुन्हा अमेरिकेला गेला

पनामा येथून डिपोर्ट झाल्यानंतर नवदीप जवळपास २ महिने घरीच थांबला होता परंतु त्याचे अमेरिकेला जाण्याचं स्वप्न पूर्ण झाले नव्हते. अखेर नवदीपने पुन्हा एजेंटशी संपर्क साधला. यावेळी एजेंटने त्याच्याकडून १५ लाखांची मागणी केली. या रक्कमेचा जुगाड करून नवदीप पुन्हा अमेरिकेला पोहचला होता. परंतु २ महिन्यांनी पुन्हा तीच वेळ आली. २७ जानेवारीला अमेरिकेत नवदीपला ताब्यात घेण्यात आले. त्याबाबत नवदीपच्या घरच्यांना माहिती देण्यात आली. अमेरिकेतून भारतात आलेल्या तिसऱ्या विमानातून नवदीपला परत पाठवलं आहे. नवदीप हे एकमेव उदाहरण नाही तर अनेकांनी त्यांची घरे, जमिनी विकून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही महिन्यातच त्यांच्यावर संकट ओढावलं आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारत