बांदिवडेत बेकायदेशीर उत्खनन तीन वर्षांपासून सुरू

By Admin | Updated: May 12, 2014 19:48 IST2014-05-12T19:48:17+5:302014-05-12T19:48:17+5:30

* चार हेक्टरमधील १००६ ब्रास खडी, दगड खासगी ठेकेदाराने केले गायब

Illegal excavation in Bannidade has been started for three years | बांदिवडेत बेकायदेशीर उत्खनन तीन वर्षांपासून सुरू

बांदिवडेत बेकायदेशीर उत्खनन तीन वर्षांपासून सुरू

*
ार हेक्टरमधील १००६ ब्रास खडी, दगड खासगी ठेकेदाराने केले गायब
* कारवाईचे ढोंग, महसूल विभागाचे बुडाले दोन लाख एक हजार दोनशे
* बुडालेली रॉयल्टीही वसूल होणार का? नागरिकांचा सवाल

किरण मस्कर
कोतोली : पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणार्‍या या स‘ाद्रीच्या पर्वत रांगेत दडलेल्या बांदिवडे (ता. पन्हाळा) गावातील हद्दीमध्ये शाहूवाडीतील खासगी कंत्राटदाराने गेल्या तीन वर्षांपासून बेकायदेशीर उत्खनन केले आहे; पण काही दिवसांपूर्वी दगड व खडी घेऊन जात असताना कंत्राटदाराचे ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडले व लगेच सोडले, याचे गौडबंगाल काय हे अद्यापही येथील नागरिकांना समजलेले नाही. याबाबत महसूल विभागाचे अधिकारी व गाव विभागाचे तलाठी धोत्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाईचे अहवाल नायब तहसीलदार पन्हाळा यांच्याकडे पाठविले आहेत, असे सांगितले; पण संबंधित कंत्राटदारावर अद्याप कारवाई न झाल्याचे दिसून येत आहे.
कोल्हापूर जिल्‘ाच्या अनेक तहसील कार्यालयांच्या कार्यक्षेत्रामध्ये येणार्‍या बहुतांशी जमिनींपैकी काही भाग मुरमाड प्रदेशाने व्यापला आहे. शासनाकडून मुरुम उत्खनन करण्यास बंदी घालण्यात आली असली, तरी पन्हाळा महसूल अधिकार्‍यांच्या पाठबळामुळे बांदिवडे येथे शाहूवाडीतील खासगी कंत्राटदार सुभाष पाटील यांनी खोतवाडी परिसरातील रस्ता करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून बेकायदेशीर उत्खनन सुरू केले आहे. आजअखेर सामाईक चार हेक्टर जमिनीमधील सुमारे १००६ ब्रास खडी-दगड उचलला असून, आजच्या शासन दरबारी रॉयल्टीप्रमाणे सुमारे दोन लाख एक हजार दोनशे रुपये रॉयल्टी पन्हाळा महसूलला जमा केली का? हे पाहणेही गरजेचे आहे.
पूर्वी शासनाकडून मुरुम, दगड उत्खननासाठी रॉयल्टी भरून परवाना दिला जायचा. त्यामुळे शासनाच्या महसूल खात्यामध्ये अधिक आर्थिक भर पडायची. मात्र, अलीकडच्या काळात शासनाने उत्खननावर बंदी घातली आहे. असे असतानाही बांदिवडे येथून सुभाष पाटील यांनी सामाईक जमीनमालकांना विचारात न घेताच त्यांच्या जमिनीत बेकायदेशीर उत्खनन केले आहे. चार हेक्टर जमिनीत पाच-सहा जमीनमालक असून, काहींनी या बेकायदेशीर उत्खननाबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेतली आहे. सर्व जमीनमालकांना विश्वासात न घेताच हे उत्खनन केल्याचे समजते.

Web Title: Illegal excavation in Bannidade has been started for three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.