शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

IIT पाटणाच्या विद्यार्थ्यांना जबरदस्त प्लेसमेंट मिळाले; कंपन्यांनी ६० लाखांपर्यंतचे पॅकेज दिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:20 IST

IIT पाटणा येथे २०२५ च्या प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले. पहिल्या टप्प्यात २०७ जॉब ऑफर प्राप्त झाल्या आहेत.

IIT पाटणामध्ये २०२५ चा प्लेसमेंट सीझन सुरु झाले आहे, येथील विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यात मोठमोठ्या पॅकेजेससह मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. या प्लेसमेंट सत्रात एकूण २०७ विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत, यामध्ये ५८ प्री-प्लेसमेंट ऑफर देखील आहेत. या वर्षी पहिल्या टप्प्यात, IIT पटणाच्या विद्यार्थ्यांना एकूण २०७ जॉब ऑफर मिळाल्या आहेत आणि सरासरी वार्षिक पॅकेज २५.५२ लाख रुपये ठेवण्यात आले आहे.

आयआयटी पाटणाच्या विद्यार्थ्यांसाठी हे प्लेसमेंट खूप यशस्वी ठरले आहे. येथील १५ हून अधिक विद्यार्थ्यांना ६० लाखांहून अधिक वार्षिक पॅकेज मिळाले आहे. याव्यतिरिक्त, १२ विद्यार्थ्यांना जपानमधील आघाडीच्या कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय नोकरीच्या ऑफर देखील प्राप्त झाल्या आहेत, यामुळे संस्थेची वाढती आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा दिसून येते.

पहिल्या टप्प्यातील प्लेसमेंटमध्ये या प्रमुख कंपन्यांकडून मिळालेल्या ऑफर: 

गुगल- १३ ऑफर्स

टूरिंग- ११ ऑफर 

मायक्रोसॉफ्ट, आरआय लिमिटेड, टायगर ॲनालिटिक्स- ९-९ ऑफर 

फ्लिपकार्ट- ७ ऑफर 

एक्सेंचर- ६ ऑफर

सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग, डेटा सायन्स, बिझनेस ॲनालिटिक्स, कन्सल्टिंग आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट यासह विविध महत्त्वाच्या प्रोफाइलसाठी या प्लेसमेंट सत्रात विद्यार्थ्यांना नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत. याशिवाय काही विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय नोकरीच्या ऑफरही मिळाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय जॉब ऑफर 

IIT पाटणाच्या विद्यार्थ्यांना Accenture Japan, Sakata Incorporation आणि NTT-TX यासह आघाडीच्या जपानी कंपन्यांकडून आंतरराष्ट्रीय ऑफर मिळाल्या आहेत. यामुळे आता  आयआयटी पाटणाचे नाव आता जागतिक स्तरावर ओळखले जात आहे.  आता पाटणा आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठीही आकर्षणाचे केंद्र बनत आहेत.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनjobनोकरीBiharबिहारEducationशिक्षण