IIT JEE Advanced 2017च्या परीक्षेचा निकाल जाहीर
By Admin | Updated: June 11, 2017 14:00 IST2017-06-11T10:44:07+5:302017-06-11T14:00:05+5:30
आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देणारी कठीण परीक्षा समजली जाणा-या जेईई अॅडव्हान्सचा निकाल जाहीर झाला आहे

IIT JEE Advanced 2017च्या परीक्षेचा निकाल जाहीर
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देणारी कठीण परीक्षा समजली जाणा-या जेईई अॅडव्हान्सचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी स्वतःचा निकाल जेईई अॅडव्हान्सच्या अधिकृत वेबसाइट(Jeeadv.ac.in) वर पाहू शकतात. याशिवाय विद्यार्थ्यांना नोंदणीकृत मोबाईल नंबरवर निकालाचे मॅसेजही पाठवण्यात येणार आहेत. जेईई अॅडव्हान्सच्या परीक्षेत हरियाणातील पंचकुलचा सर्वेश मेहतानी हा देशात पहिला आला आहे.
आयआयटीमधल्या विविध पदवीधर कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई अॅडवान्सचं आयोजन केलं जातं. जेईई अॅडव्हान्सचे पेपर 1 आणि पेपर 2ची परीक्षा 21मे रोजी झाली होती. 1 लाख 7 हजार विद्यार्थी जेईई अॅडव्हान्ससाठी बसले होते. त्यात खुल्या वर्गातील आणि इतर मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास समान आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाचे खुल्या वर्गातील 4 हजार 394 विद्यार्थी, तर इतर मागासवर्गीय वर्गातील 7 हजार 460 विद्यार्थी आणि अनुसूचित जातीचे 4 हजार 619 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.
राजस्थानचा सूरज देशात पाचवा आला आहे. सूरजला 366 पैकी 330 गुण मिळाले आहेत. सूरजचे वडील कंत्राटी शिक्षक असून, आई गृहिणी आहे. सूरज हा राजस्थानच्या कोटामधील व्हायब्रंट अकॅडमीचा विद्यार्थी आहे. पुण्यातील अक्षत चुघ हा देशात दुसरा आला आहे. देशात पहिल्या आलेल्या सर्वेशला 366 पैकी 339 गुण मिळाले आहेत. जेईई मेन्समध्ये तो 55वा होता. सर्वेश हा चंदीगडचा विद्यार्थी आहे.
असा पाहा निकाल
जेईई अॅडव्हान्सच्या अधिकृत वेबसाइट(Jeeadv.ac.in) जा
वेबसाइटवर रिझल्ट पेजवर क्लिक करा
JEE Advanced (2017) क्लिक करा
त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून रिझल्ट पाहा
विद्यार्थी results.nic.in या results.gov.in इथेही निकाल पाहू शकतात