शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटी बाबा अभय सिंह : शेवटच्या पानांवर असतात स्वप्ने अन् सुप्त इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 11:23 IST

मला आश्रम सोडून जाण्यास सांगितल्याचा दावा आयआयटी बाबांनी केला आहे.

महाकुंभ नगर : महाकुंभ मेळ्यात आयआयटी बाबा अभय सिंह यांचा खूप बोलबाला आहे. आयआयटी मुंबईतून एअरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी ‘दी लास्ट पेज ऑफ दी नोटबुक’ असा एक प्रकल्प केला. कोटा येथे कोचिंग क्लासमध्ये शिकणारे, हॉस्टेलमध्ये राहात असलेल्या विद्यार्थ्यांनी शेवटच्या पानावर काय लिहिले जाते याचा अभ्यास करून त्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण केले होते.

२०१४ साली त्यांनी या प्रकल्पाच्या निष्कर्षांत अभय सिंह यांनी म्हटले होते की, विद्यार्थ्यांच्या मनात अनेक सुप्त इच्छा असतात. त्यांची पूर्तता होत नसल्यास त्याबद्दल मनात आलेले विचार शेरेबाजीतून आपल्या वह्यांच्या शेवटच्या पानावर लिहितात. मनातले विचार या पानांवर चित्र काढून व्यक्त करतात. त्यांनी केलेले हे भावनांचे विरेचन असते. अभय सिंह यांना असे आढळले की, वहीची सुरुवातीची पाने संबंधित विषयाच्या नोट्स लिहिण्यासाठी वापरलेली असतात, पण सर्वांत मागच्या पानावरचा मजकूर हा बहुतांश वेळा त्या विषयाशी संबंधित नसतो. (वृत्तसंस्था) 

‘मला निघून जाण्यास सांगितले’आयआयटी बाबा अभय सिंह हे महाकुंभ मेळ्यातून जुन्या आखाड्यातील आश्रमातून बेपत्ता झाले अशा आशयाच्या बातम्यांचा त्यांनी इन्कार केला आहे. प्रसारमाध्यमांशी सातत्याने संवाद साधणाऱ्या या बाबांची मानसिक स्थिती नीट नाही, असा दावा काही साधूंनी केला होता. तो त्यांनी खोडून काढला आहे. मला आश्रम सोडून जाण्यास सांगितल्याचा दावा आयआयटी बाबांनी केला आहे. मी प्रसिद्ध झालो,  हा आमची गुपिते फोडेल अशी आश्रम संचालकांना भीती वाटली, असेही त्यांनी सांगितले.  

एअरोस्पेस इंजिनीअरमध्ये उच्चशिक्षणकोटा येथे विद्यार्थी त्यांच्या वहीच्या शेवटच्या पानांवर नेमके काय लिहितात या विषयावर अभय सिंह यांनी वर्षभर अभ्यास केला. आयआयटी इंजिनिअर ते संन्यासी असा प्रवास करणारे अभय सिंह हरयाणातील झज्जर जिल्ह्याचे मूळ रहिवासी आहेत. कोटा येथील कोचिंग क्लासमध्ये शिकावे, अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. मात्र, ते दिल्लीमध्ये आले. जेईईमध्ये ७३१वी रँक मिळवून त्यांनी आयआयटी मुंबईत एअरोस्पेस इंजिनिअरिंगमधून पदवी शिक्षण घेतले. ते पहिल्याच फटक्यात जेईई परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांनी डिझाईनिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळा