घरकूल मक्तेदाराला नोटीस आयएचएसडीपी योजना : थकीत बिल अदा करूनही काम सुरू करण्यास टाळाटाळ
By Admin | Updated: April 4, 2016 00:40 IST2016-04-04T00:40:17+5:302016-04-04T00:40:17+5:30
जळगाव : मनपातर्फे आयएचएसडीपी योजनेंतर्गत पिंप्राळा हुडको येथे दांडेकरनगर झोपडपीधारकांसाठी घरकूल बांधण्यात येत आहेत. मात्र मक्तेदाराला थकीत बिल अदा करूनही, सुधारीत प्रकल्प अहवालाच्या मंजुरीचे पत्र येईपर्यंत काम पुन्हा सुरू करण्यास मक्तेदाराकडून टाळाटाळ होत असल्याने मनपातर्फे मक्तेदाराला नोटीस बजावण्यात येणार आहे.

घरकूल मक्तेदाराला नोटीस आयएचएसडीपी योजना : थकीत बिल अदा करूनही काम सुरू करण्यास टाळाटाळ
ज गाव : मनपातर्फे आयएचएसडीपी योजनेंतर्गत पिंप्राळा हुडको येथे दांडेकरनगर झोपडपीधारकांसाठी घरकूल बांधण्यात येत आहेत. मात्र मक्तेदाराला थकीत बिल अदा करूनही, सुधारीत प्रकल्प अहवालाच्या मंजुरीचे पत्र येईपर्यंत काम पुन्हा सुरू करण्यास मक्तेदाराकडून टाळाटाळ होत असल्याने मनपातर्फे मक्तेदाराला नोटीस बजावण्यात येणार आहे. मनपातर्फे पिंप्राळा हुडको येथेच आयएचएसडीपी योजनेंतर्गत ४७२ घरकुलांची योजना राबविली जात आहे. त्यापैकी २६० घरकुलांचे कामकाज पूर्ण होत आले आहे. मात्र उर्वरित इमारतींचे काम सुरू झालेले नाही. त्यासाठी आधी तेथे स्थलांतरित करून आणलेल्या झोपडपीधारकांच्या झोपड्या होत्या. त्या बाजूला सरकवून काम सुरू करण्यास या झोपडपी धारकांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे काम सुरू करण्यात अडचण निर्माण झाली होती. अखेरीस आयुक्त संजय कापडणीस यांनी या ठिकाणी जाऊन झोपडपीधारकांशी चर्चा केल्यावर जागा मोकळी करण्यात आली. या मोकळ्या झालेल्या जागेवर उर्वरित २१२ घरकुलांसाठी ३ इमारतींचे काम बाकी आहे. मक्तेदाराने प्रतिघरकुल २ लाख रुपये वाढवून मागितल्याने सुधारीत डीपीआर केंद्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. तो मंजूर झाल्यावर तसेच आधीची थकबाकी मिळाल्यावर काम सुरू करण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार झालेल्या कामाचे बिल अदा करण्यात आले आहे. तसेच सुधारीत डीपीआरही मंजूर झाला आहे. केवळ त्याचे लेखी आदेश येणे बाकी आहेत. मक्तेदाराने मनपाला मुदतीत काम पूर्ण करण्याची हमी दिली आहे. मार्च २०१७ पूर्वी हे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र आठवडाभरापेक्षा अधिक कालावधी उलटूनही मक्तेदार वेगवेगळी कारणे पुढे करून काम सुरू करण्यास टाळाटाळ करत असल्याने मक्ता घेतलेल्या कंपनीच्या मालकाला आयुक्तांनी चर्चेसाठी पाचारण केले आहे. तसेच मक्तेदाराला नोटीसही बजावण्यात येणार आहे. ------ इन्फो------काय आहे नोटीस?या नोटीसनुसार मनपाने मक्तेदाराचे मागील बिल अदा केलेले असल्याने तसेच मक्तेदाराने हे काम मुदतीत पूर्ण करून देण्याबाबतचे हमीपत्र दिलेले असतानाही प्रत्यक्ष कामास आठवड्यापेक्षा जास्त कालावधी उलटूनही सुरूवात केलेली नाही. जर काम मुदतीत पूर्ण झाले नाही, व शासनाने पुढील निधी दिला नाही तर त्याची जबाबदारी मक्तेदाराची राहील, अशी नोटीस बजावण्यात येणार आहे.